Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

*तुळजापूर तालुक्यातील ऑनलाइन सोयाबीन झालेल्या शेतकऱ्याकडून सोयाबीन खरेदीसाठी "रास्ता रोको "आंदोलन*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

तुळजापुर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाने सोयाबीन ऑनलाईन नोंद झालेली ते सोयाबीन शासनाने दिलेल्या हमीभावात खरेदी करणे बाबत. तसेच आजरोजी वार बुधवार दुपारी 12.00 वाजता जुन्या बसस्टॅन्ड चौकात सोयाबीन भरलेल्या वाहनासकट तुळजापूर तालुक्यातील ऑनलाइन सोयाबीन झालेले सर्व शेतकरी वर्गाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले याबाबत केलेल्या आंदोलना आणि निवेदनाद्वारे केलेली मागणी पुढील प्रमाणे

उपरोक्त विषयी निवेदन देण्यात येते की, तुळजापुर तालुकयातील शेतक-यांनी रक्ताचे पाणी करुन सोयाबीन पिकवले असुन तसेच महाराष्ट्र शासनाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी शेतक-यांना ऑनलाईन करण्याबाबत कळविले होते. त्याअनुषंगाने तुळजापुर तालुकयातील बहुतांश शेतक-यांनी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन सोयाबीनची नोंद केली आहे. परंतु आजतागायत आमचे सोयाबीन शासनाने खरेदी केले नाही. ते त्वरीत तुळजापुर तालुक्यामध्ये जेवढ्या शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन शासनाने खरेदी करावे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी मुदतवाढ देऊन तुळजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात यावे त्या अनुषंगाने आज रोजी केलेल्या जुन्या एसटी स्टँड चौकात सोयाबीन भरलेल्या वाहना सकट रास्ता रोको आंदोलन चालू आहे तसेच दिनांक 30 डिसेंबर 2024 ते 15, जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्र शासनाने सोयाबीन खरेदी केंद्रास बारदाना न दिल्याने ऑनलाइन शेतकऱ्यांचे सोयाबीन गेले नाही केवळ महाराष्ट्र शासनाच्या चुकीमुळे आज रोजी तुळजापूर तालुक्यातील बरेच शेतकरी सोयाबीन खरेदी पासून वंचित रहात आहे याची कृपया नोंद घेऊन शासनास मुदत वाढ देण्यासाठी आपण आपल्या स्तरावर पुढील कार्यवाही करावी व उद्या होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनास सर्वस्वी आपणच स्वतः जबाबदार रहाल असा इशाराही निवेदनात दिला आहे 




        माहितीस्तव प्रत

पोलीस निरीक्षक तुळजापूर पोलीस स्टेशन तुळजापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा