Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

नरसिंहपूर मार्गावरील पुलालगत ऊसाचा ट्रेलर पडला, रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता खचल्याने ऊसाचा ट्रेलर पडला.


 

*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147*

----- संत तुकाराम महाराज पालखी बाह्यवळण रस्त्याच्या नरसिंहपूर मार्गावरील पुलालगत ऊसाचा ट्रेलर पडला. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता खचल्याने ऊसाचा ट्रेलर पडला. अशाच प्रकारे अनेक वाहनांना अपघात घडला आहे.

    संत तुकाराम महाराज पालखी बाह्यवळण रस्त्यावरील बावडा नरसिंहपूर मार्गावर पुलाच्या दुतर्फा सर्व्हिस रोड करण्यात आला आहे. त्या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याने दोन चाकी, चार चाकी तसेच ट्रॅक्टर, ट्राॅल्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.



    सध्याला साखर कारखान्यांचा हंगाम सुरू असून ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतू शासनाने पालखी मार्गाला हजारो कोटींचा निधी देवूनही अनेक कामे निकृष्ट दर्जाचे केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही काळजी घेतली गेल्याचे दिसून येत नाही.

फोटो - बावडा संत तुकाराम महाराज पालखी बाह्यवळण मार्गावर ऊसाच्या ट्रेलर पडला.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा