*इक्बाल बाबासाहेब मुल्ला (पत्रकार).* *सांगली*
*मो:-8983587160*
आरोपी राष्ट्रपतीयांच्याकडे दयायाचना करून फाशीची शिक्षा रद्द करत असतो म्हणून "नराधम" आरोपीना जशास तसे उत्तर देण्यासाठी ज्याप्रमाणे पोलिसांनी बदलापूर लैंगिक प्रकरणाचा आरोपी "अक्षय शिंदे" याचे एन्काउंटर केले तसेच एन्काउंटर "जतमधील" चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून करणाऱ्या आरोपीचे व्हावे किंवा त्वरित फाशी. द्यावी अशी अपेक्षा आज सर्वथरातुन व्यक्त झाली.
ज्या पांडुरंग या आरोपीने चिमुकल्या मुलीचा गळा घोटला त्याच पांडुरंग याच्या "घशात" दररोज दोन वेळा ही चिमुकली आणि तिचे कुटुंब अन्न घालत होते. अनाथ आहे म्हणून या पांडुरंग याला खून झालेल्या घरातून दोनवेळा जेवण दिले जायचे. परंतु त्यानेच चिमुकलीचा "गळा" घोटला. निदान या उपकाराची जाणीव या नराधमाने ठेवायला हवी होती.परंतु उलट्या काळजाच्या या स्वार्थी पांडुरंगने लैंगिक अत्याचार करून खून केला आणि परोपकाराची अशी परतफेड केली.
*जत मध्ये भव्य निषेध मोर्चा कडकडीत बंद !*
जत मधील या खुनाच्या निषेधार्ध जत शहर कडकडीत बंद ठेवले गेले.यावेळी शालेय मुलींकडून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून पोलिसांना निवेदन देण्यात आले. विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या माध्यमातून निषेध मोर्चा काढण्यात आला. सुरेश शिंदे, डॉ . रवींद्र आरळी,सुजय शिंदे, मन्सूर खतीब डॉ.ममता तेली,डॉ.विद्या नाईक व अन्य कार्यकर्ते यात सहभागी होते.
*मिरजमध्ये जागृत जनमानस !*
मिरजेमध्ये काळा झेंडा घेऊन सर्वधर्मीय भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान, अय्याज नायकवडी, जैलाब शेख आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वहिदा नायकवडी,संगीता हारगे,बिल्किस बुजरूक, राधिका हारगे,रुक्मिणी आंबिगीरे, राधिका हारगे, नर्गिस सय्यद आरोपीला कडक शिक्षा व्हावी ही आग्रही मागणी केली. यावेळी तानाजी सातपुते,अभिजित हारगे, चंदू मैगुरे,रोहित शिंदे यांनी देखील सडेतोड विचार मांडत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली.
*इस्लामपूर मध्ये ही फाशीची मागणी !*
इस्लामपूर मध्ये शाकीर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली मूकमोर्चा काढला गेला. आणि निवेदन देण्यात आले. यावेळी शंकर महापुरे,,मकरंद करळे,दिग्विजय पाटील,व अन्य उपस्थित होते.
सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे देखील जलदगती न्यायालयात ही केस चालवावी म्हणून सुफियान पठाण, मुफ्ती सादिक पटेल ,हाफिज सद्दाम आणि अन्य कार्यकर्त्यांच्या समवेत पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांना निवेदन देण्यात आले.
*मुस्लिम समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !*
सांगलीत जिलाधिकारी कार्यालयात आरोपीला फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन आरोपीला फाशी व्हावी व चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून निवेदन दिले गेले.आरोपीला एकाच चष्म्यातून पाहावे, आणि बलात्कार आणि खून या गुन्ह्यासाठी तातडीने शिक्षा व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली गेली.
यावेळी असिफ बावा, रज्जाक नाईक ,कय्युम पटवेगार, अज्जू पटेल, सलीम पन्हाळकर, इम्तियाज भालदार, जावेद मुल्ला, सर्फराज शेख ,अकबर शेख ,मुनीर मुल्ला, तोहीद मुजावर , मुन्ना शेख, सुहेल बलबंड,आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी
ही अपेक्षा !
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा