Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

*रक्तदान म्हणजेच वेळेवर मदत आणि एक सामाजिक बांधिलकी जपणे--- रक्तदाते-किशोर घोडके*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासन मान्यता प्राप्त भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज यांच्या वतीने शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला.

           या शिबिराचे उद्घाटन आता पर्यंत ४९ व्या वेळा रक्तदान करणारे किशोर घोडके यांच्या शुभहस्ते तसेच रक्तदाते प्रमोद इनामदार त्यांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने संपन्न झाले.

               किशोर घोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,मी आज या शिबिराच्या निमित्ताने ४९ व्या वेळा रक्तदान करताना गरजू रुग्णास वेळेवर रक्ताची मदत आणि त्यानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपल्याचा अशा संगमाचाच जणू कुंभमेळ्यातील संगमावरील पवित्र स्नान केल्यासारखा मनस्वी आनंद घेत आहे असे सांगत रक्तदान हे श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णास वेळेवर रक्त उपलब्ध झाले तर त्याचा प्राण वाचू शकतो व रक्तदानासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीने वर्षातून किमान दोन वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे मत व्यक्त केले.



          याप्रसंगी किशोर घोडके, प्रमोद इनामदार,करणराज घोडके,सीए नितीन कुदळे,श्रीमंत बर्वे,ज्ञानदीप जवंजाळ,आर्यन नागरगोजे,विजय शिंदे,सुरज साबळे,सुरज साळुंखे,करण खंडागळे,यश कदम,दर्शन उपाध्ये,अंकुश घुगे,योगीराज खुडे,सुरज दगडे,अभिजीत गायकवाड,आकाश मोरे,नागनाथ गोरड,वैभव देवकते,रोहित चव्हाण,ऋत्विक खंडागळे, विकास जाधव,ऋषीराज शिंदे, जय थोरात,अतुल थोरात,सौ. मंदा घोडके,काजल वळकुंडे, तृप्ती गायकवाड आणि प्रियांका चव्हाण यांनी ही रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला.

         याप्रसंगी रक्तपेढीचे इन्चार्ज डॉ.संतोष खडतरे आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी मार्गदर्शन केले. तर रक्तपेढीचे काळे सिस्टर, अनिल लोखंडे आणि सहकारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी अशोक साळुंखे, उमाजी भोसले,ओंकार भांडवले, सयाजी गायकवाड,शुभम बनपट्टे,ओंकार गोंदकर,विक्रम घोडके,दिलीप उकिरडे आणि इन्नुस मुलाणी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा