*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीचे औचित्य साधून नातेपुते (ता.माळशिरस) येथे जिजाऊ ब्रिगेडच्या नवीन शाखेची स्थापना करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षा सीमाताई बोके यांच्या मार्गदर्शनाखाली अक्काताई माने,प्रियाताई नागणे व सुरजाताई बोबडे,मनीषा जाधव यांच्या सहकार्याने या शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा मनोरमा लावंड या उपस्थित होत्या.
नातेपुते येथील नवीन जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेच्या अध्यक्षपदी शिवमती सेजल सत्यजित सावंत,उपाध्यक्षपदी शिवमती श्रध्दा चंद्रशेखर चव्हाण कार्याध्यक्षपदी शिवमती नीता अमोल पवार,सचिवपदी शिवमती पल्लवी अशोक शिंदे, कोषाध्यक्षपदी शिवमती विद्या विनोद थोरात,प्रसिद्धी प्रमुखपदी शिवमती जयश्री ज्ञानदेव बेरलिंगे,संघटकपदी शिवमती जयश्री शंकर अटक,शिवमती सुनिता नानासो सोनमळे, शिवमती अश्विनी अमोल कावरे यांची निवड करण्यात आले आहे
याप्रसंगी नूतन अध्यक्षा शिवमती सेजल सावंत यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, जिजाऊ ब्रिगेडचे कार्य तळागाळातील महिलांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असून जास्तीत जास्त महिलांना जिजाऊ ब्रिगेडच्या सहभागी करून चांगले कार्य करणार असल्याचे सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा