Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

*केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री "रामदास आठवले "यांची- आमदार सुरेश धस, यांच्यावर टीका...*


  

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

आमदार सुरेश धस यांनी परभणी आंदोलनातील निर्दोष आंबेडकरी तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिसी मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करू नका, मन मोठे करून पोलिसांना माफ करा, अशी दुटप्पी व धक्कादायक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र निषेध केल्याचे म्हटले आहे .


संपूर्ण महाराष्ट्रात बीडचे सरपंच देशमुख हत्येचा आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिसी अत्याचाराने झालेल्या हत्येचा दलित आणि मराठा समाजाने एकत्र येऊन निषेध केला आहे. दलित-मराठा दोन्ही समाज एकत्र येऊन न्याय मिळण्यासाठी लढा देत आहेत. त्यात फूट पाडण्याचे पाप धस यांनी करू नये. जशी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना माफी नाही, तशीच सोमनाथ सूर्यवंशी यांच्याही मारेकऱ्यांना माफी नाही, हीच भूमिका धस यांनी घ्यायला पाहिजे. मात्र, त्यांनी विपरित भूमिका घेतल्याने रिपब्लिकन पक्षाच्यावतीने त्यांचा तीव्र निषेध करतो, असे आठवले यांनी म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा