Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

*सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टाटा* *मोटर्स व इटोन इंडस्ट्रियल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव* *पुणे येथे निवड*


 

*अकलूज ----प्रतिनिधी*

*एहसान.   मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी,अकलूज*

अकलूज येथील सहकार महर्षि  शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर मधील तृतीय वर्ष मेकॅनिकल अभियांत्रिकी मधील ४ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स व इटोन इंडस्ट्रियल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव पुणे येथील या नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण  ढवळे सर यांनी दिली.  

याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. प्रवीण ढवळे सर म्हणाले, वाहन निर्मितीमधील अग्रगण्य असणाऱ्या कंपनीपैकी एक टाटा मोटर्स व इटोन इंडस्ट्रियल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव पुणे, या नामांकित कंपनीच्या प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन केले होते. सदर ड्राइव्ह साठी परिसरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून अंदाजे २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. याच प्रसंगी सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदविका मेकॅनिकल विभागातील सहभागी विद्यार्थ्यांपैकी कु. कीर्ती रिसवडकर व कु.गायत्री क्षीरसागर,यांची टाटा मोटर्स  पुणे व चि. प्रथमेश माने-देशमुख व चि. प्रतिक पवार यांची इटोन इंडस्ट्रियल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव पुणे या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

सदर निवडी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व ट्रस्टचे अध्यक्ष माननीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील  यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. तसेच मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील शंभर टक्के प्लेसमेंटची  आशा


व्यक्त केली.

विभाग प्रमुख प्रा. निकम एस. एम., कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.शेटे वाय. एस. तसेच समन्वयक प्रा.धनवले एस. पी. यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा