Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

*धाराशिव जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा काढून घेणे म्हणजे तोंडातील घास काढून घेण्यासारखे.... महाविकास आघाडी तुळजापूर तालुका*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448* 

इतकी वाईट वेळ का आली ?

शासनाच्या आरोग्य विभागाने धाराशिव येथील एम आर आय तर तुळजापूरच्या रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन अनुक्रमे कोल्हापूर व लोणावळा येथे घेऊन जाण्याचा घाट घातला आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्यात आधीच तर वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. ६० खाटांच्या स्त्री रुग्णालयात दररोज शंभरावर महिला रुग्ण जमिनीवर झोपून उपचार घेतात. औषधींचा तुटवडा कायमच असतो. गंभीर रुग्णांना सोलापूरला पाठवले जाते. अशी स्थिती असताना आहे त्या सुविधा दुसरीकडे पळवणे अजिबात योग्य नाही. आणि मुळात इतकी वाईट वेळ आरोग्य विभागावर आलीच का, याचेही उत्तर या विभागाला द्यावे लागेल. 


अकांक्षित धाराशिव जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा काढून घेणे म्हणजे आमच्या तोंडातील घास काढून घेण्यासारखे आहे. इतकी या सरकारची नीतिमत्ता ढासळली आहे का? वाढीव सुविधा देणे दूरच, आहे त्या काढून घेण्याचा प्रयत्न आम्ही धाराशिवकर अजिबात सहन करणार नाहीत. 


हा निर्णय रद्द करावा यासाठी आरोग्यमंत्री मा. ना. प्रकाशजी आबिटकर यांना निवेदनाद्वारे आपण मागणी केली आहे.. 




या उपरही हा निर्णय रद्द नाही झाल्यास आम्ही तुळजापूरकर व तुळजापूर तालुक्यातील महाविकास आघाडी आपल्या पद्धतीने समाचार घेऊत.. वेळ प्रसंग या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल  याची कृपया नोंद  घ्यावी( तुळजापूर शहर तालुका महाविकास आघाडी तुळजापूर) श्याम पवार. अमर चोपदार .अमोल कुतवळ .अमरभैया मगर.सुधीर कदम .राहुल खपले. सुनील जाधव अनमोल साळुंखे .नवनाथ जगताप. शरद जगदाळे व सर्व महाविकास आघाडी व घटक पक्ष तुळजापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा