*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
वर्षातून एकदाच येणारे फळांचा राजा असलेले व आहार व वैदयकीय दृष्ट्या अन्यन्य साधारण महत्व । असलेले आंबा पीकाचे क्षेत्र व उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. किफायतशीर उत्पनासाठी, उत्पादकतचा वापरकर्तात्या /ग्राहक च्या किमंती मधील हिस्सा वाढविणेसाठी निर्यात साठी प्रचंड वाव आहे . या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या जागतिक मुक्त अर्थव्यवस्थेमुळे कृषि मालाच्या निर्यातीत जागतीक बाजारपेठ नियम व अटी अधारे खुली झाली आहे. यामुळे निर्यातीत लक्षणीय वाढ होत असलेले दिसून येत आहे . निर्यात मुळे देशाला मौल्यवान परकिय चलन मिळवून देणे, मुल्यवर्धन, साठवनुक, दर स्थिरीकरण, रोजगार निर्मिती साठी निर्यातीस या संधीस मोठा वाव आहे . जगात भारत देश आबा उत्पादनात प्रथम कम्रांकवर आहे. एकूण उत्पादनपैकी ५० % आंबा भारतात उत्पादीत होतो . यामुळे आंबा फळे व प्रल्प निर्यातीस खुप मोठा वाव आहे. महाराष्ट्र व भारतात पिकणाऱ्या हापुस, केशर, बेगमपल्ली, चौसा, दशेरी, लंगडा, तोतापुरी, मालिका इत्यादी जाती निर्यात करण्यास वाव आहे व होत आहेत. आंबा उत्पादक शेतकरी बंधूनी फार्मर कनेक्ट मोबाईल अँप वर मॅगोनेट द्वारे निर्यातक्षम आंबा पिक क्षेत्र नोंदणी प्रपत्र -१ मध्ये अर्ज व सोबत ७ / १२ आंबा पीक नोंदसह, ८ अ, चतुःसिमा, आधार कार्ड, सह आंबा बागेची प्लॉटनिहाय नोंदणी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी२०२५या कालावधीत निशुल्क करता येते. आंबा निर्यातदारांनी मॅगोनेट द्वारे नोंदणी केलेल्या शेतकर्यांच आंबा देश परित्व योग्य ती ट्रिटमेन्ट करून संबंधीत देशासाठी फायटोसेनेटरी अँथोरिटी कडून फायटोसॅनटरी सर्टिफिकेट घेऊनच निर्यात करता येते . सोलापुर फायटोसॅनेटरी अधिकारी आयातदार अमेरिका, युरोपीयन युनियन, जपान, ऑस्ट्रेलिया व इतर देशांच प्लॉन्ट कोरंटाईन अटी व शर्ती पूर्तता केल्यावर आंबा निर्यात करिता पी. क्यू . एम . एस या ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे फाइटो सॅनेटरी सर्टिफिकेट देतात व देण्यात येते. निर्यातक्ष आंबा उत्पादनाकरीता शेतक्यांनी घ्यावयाची काळजी १ - निर्यात आंबा बागेची प्लॉटनिहाय मॅगोनेट वर नोंदणी संबंधीत जि.अ.कृ अ यांचे कडे ऑनलाईन / ऑफलाईन २८ फेब्रुवारी पूर्वी निशुल्क करून घ्यावी . २ नोंदणीकृत आंबा बागाची किड व रोग नियंत्रण व पीक संरक्षण औषधाचा वापर अभिलेख ठेवाव . प्रामुख्याने शिफारस औषधे व मात्रा चा वापर लेबल क्लेम प्रमाणेच करावा . ३ फळमाशी व स्टोन व्हिवील ही प्लॉन्ट कोरटाईन पेस्ट असल्याने फेरेमेन ट्रॅप्स लाईट ट्रप्स ' आमिश ट्रप्स व लेबल कलेम औषधाच वापर करावा . ४- आंबा फळाचा दर्जा हा वजन आकार रंग यावर ठरलेली असल्याने निर्यात प्रमाणके प्रमाणे उत्पादन करणे गरजेचे आहे. ५ - युरोपीअन देशांना आंबा निर्मात साठी पुणे अपेडा सहकार्याने पुणे येथील प्रयोगशाळेत किडनाशक उर्वरीत अंश तपासणी करणे बंधनकारक आहे . आवेष्टन व प्रतवारी अधिनियम १९३७ नुसार प्रतवारी व पॅकीग अपेक्षीत आहे. ६ - अमेरिका साठी आबा निर्यातीकरीता फळमाशीची हमी देणेसाठी वि -किरण तसेच जपान साठी उष्ण बाष्प उपचार करीता आंबा उत्पादक व निर्यातदार यांनी नजीकचे महाराष्ट्र राज्य कृषि उत्पन मंडळाच्या वाशी येथील पॅक हाऊस कडे नोंदणीकरून उपचार घेणे गरजेचे आहे. आंबा निर्यात माणके - १ -फळे २०० ते ८०० ग्रैम, रंग पिवळा किंवा तांबुस लालसर पूर्ण वाढ झालेली असावीत . २ - टरपेन्टाईन सारखी चव असणारी नसावीत . ३ - अंब्यातील कोय वाढणेस सोपी असणाऱ्या जाती ४- फळात तंतूमय पदार्थ नसावेत . ५ - अ गट -२०० ते ३०० ग्रैम, ब गट - ३५१ ते ५५० ग्रॅम, क गट प्र५५१ ते ८०० ग्रॅम प्रमाणके प्रमाणे असतील तर निर्यात करता येते. काढणीपश्चात व्यवस्थापन - १ - ८५ % तयार झालेलाच आंबा फळ काढावे . २ काढणी शक्यतो सकाळी ११ व सायं ४ नंतर करावी . ३ काढणीनंतर फळे झिरो एनर्जी कुल चेबर मध्ये प्रिकुलीग साठी कॅरेट मध्ये ठेवावीत . ४ काढणी केलेले आंबे २% मिठाचे द्रावणात टाकून तरंगणारे आंबे काढून टाकावेत . ५ - काढणी वेळी ३ ते ५ से.मी देठ ठेवूनचा काढणी करावी . ६ काढणीसाठी आंब्यातील विद्राव्य घटक ८-१० आसावा . ७- आंबा काढणी व वहातूक सावलीत करावी व हाताळणी हात स्पर्श कमी करून प्लेस्टीकेचे कॅरेट ट्रे वापरावेत . ८- आंबे ढीग घालून ठेवता पेटीत ठेवावेत . ९ -आंबे पिकताना कुजू नये म्हणून १० लि पाणी + १० ग्रॅम कार्बेन्डेझीम यी द्रावण प्रक्रिया करावी . १० - आबा शीतगृहात १२.५ डीग्री सेन्टीग्रेड तपमानात ठेवावेत . पंचक्रोशीतील आंबा उत्पादन व निर्यात चा वाव लक्षात घेता वरील कार्यपध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे व अधिकचे माहितीसाठी नजीकच्या कृषि विभाग कार्यालयात संपर्क करण्याचे आहवान मंडळ कृषि अधिकारी अकलुज कार्यालयाने केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा