*नळदुर्ग--- प्रतिनिधी*
*रहेमानभाई- शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
वागदरी ता. तुळजापूर जि.( उस्मानाबाद) धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत" महिला दिन" उत्साहात साजरा करण्यात आला
महिलाही अबला नसून आता सबला बनली आहे प्रत्येक क्षेत्रात हे महिलांचे योगदान बहुमूल्य असून घरातील महिला मुळे कुटुंब हा सुसंस्कृत होत असतो प्रत्येक महिलेला तिला तिचा अधिकार प्राप्त करण्याचा अधिकार असून त्या परावलंबी नसून स्वावलंबी आहे
ती आई आहे, -- ती बहीण आहे,-- ती ताई आहे --ती मैत्रीण आहे-- ती पत्नी आहे --ती मुलगी आहे-- आणि तीच जन्म आहे --ती माया आहे -- ती सुरुवात आहे --आणि ती सुरुवात आहे तर बाकी सर्व व्यर्थ आहे!...
याप्रसंगी 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान करणे हे कर्तव्य समजून महिलांचा शाल साडी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले तसेच हरिभक्त पारायण श्री सुभाष इंगळे महाराज व मित्र मंडळ आणि वासचल्य सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना ताट वाटी चे वितरण करण्यात आले
याप्रसंगी जतते मॅडम, तानाजी लोहार सर, शिवाजीराव मिटकर गुरुजी, किशोर सुरवसे, बाळू पवार ,तसेच पंचक्रोशीतील महिला नागरिकांनी विद्यार्थी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा