Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २७ मार्च, २०२५

*माळीनगरच्या शिवशंकर राजमाने यांची नवोदय विद्यालयात निवड,*

 


*उपसंपादक ---नुरजहां शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

केंद्रीय नवोदय विद्यालय समितीच्या वतीने १८ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश पात्रता परीक्षेत माळीनगर (ता.माळशिरस) येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेचा विद्यार्थी शिवशंकर आश्रीनाथ राजमाने ( इ.५ वी) याची ओबीसी संवर्गातून गुणवत्तेच्या आधारावर ग्रामीण विभागातून मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शै.वर्ष २०२५-२६ च्या इ.६ वीत प्रवेशासाठी निवड झाली आहे.

        चि.शिवशंकर याची निवड झाल्याबद्दल दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे यांचे हस्ते चि.शिवशंकर याचा फेटा बांधून,शाल व हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी चि.शिवशंकर चे वडील आश्रीनाथ राजमाने,आई सोनालीताई राजमाने व मार्गदर्शक शिक्षक अभिजीत हेगडे,सुखदा विधाते यांचाही प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

           याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे, पर्यवेक्षक कल्याण कापरे, राजीव देवकर, संजय पवार, शिक्षिका वैशाली बनकर आदी शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



       या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे,व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे,खजिनदार ज्योतीताई लांडगे,संचालक अनिल रासकर,ऍड.सचिन बधे,डॉ.अविनाश जाधव,रत्नदीप बोरावके, कल्पेश पांढरे,पृथ्वीराज भोंगळे,दिलीप इनामके, संचालिका लीनाताई गिरमे व विश्वस्त मंडळ यांनी विद्यार्थी चि.शिवशंकर चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा