*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे सिझन २०२४-२५ मध्ये हंगाम अखेर पर्यंतची सर्व तोडणी वाहतूक बिले वाहन मालकांना आदा करणेत आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये सभासद, बिगर सभासद,दिर्घमुदत करारदार यांच्या गळीतास आलेल्या ऊसाची बिले शासनाच्या धोरणानुसार ज्या-त्या पंधरवड्यामध्ये त्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आली असून ऊस तोडणी वाहतूकीची सर्व बिले वाहतूदार यांचे बँक खातेवर वर्ग करणेत आली आहेत.तरी गळीत हंगाम २०२५-२०२६ करीता बैलगाडी,बजाट,ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार यांनी जास्तीत जास्त तोडणी वाहतूकीचे करार करून गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले.
याप्रसंगी बैलगाडी,बजाट, ट्रक,ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा