Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ मार्च, २०२५

*तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील एसआयटी लावून या दोषीवर व मुख्य आरोपीवर मकोका लावावा तुळजापूर महाविकास आघाडीची मागणी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील एस.आय.टी नेमावी व या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषीवर व मुख्य आरोपींवर मकोका लावावा. अशी मागणी महाविकास आघाडी व घटक पक्ष तुळजापूर शहर व तालुक्याच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी कि



 तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची पाळे मुळे शहर आणि ग्रामिण भागापर्यंत गेली आहेत. याची पाळे मुळे उखडून काढायची असतील तर मुख्य आरोपी वर कडक कायदाचा अवलंब करावा लागणार आहे. म्हणजेच भविष्यात ड्रग्ज व्यवसाय किंवा ड्रग्ज चे सेवन करणार नाही या प्रकरणात राजकीय पक्षांशी संबंधीत असणा-या पदाधिका-यांचा सहभाग असून यांचे धागेदोरे मुंबई-पुणे पर्यंत गेले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन एस.आय.टी नेमावी तसेच मुख्य आरोपी व दोर्षीवर मकोका लावण्यात यावा हि मागणी निवेदनाद्वारे केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा