Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २९ मार्च, २०२५

*हिंदू मुस्लिम एकतेसाठी मराठा समाज कोठे कमी पडणार नाही-- "मराठा सेवक", आनंद काशीद*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

बावी (आ). येथे इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आनंद काशीद म्हणाले सध्या राज्य व देश राज्यकर्त्याना वेगळ्या वळणावर घेऊन जायचा आहे पण आपण सर्वजण छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आहोत शिवरायांनी त्त्यांच्या आयुष्यात कोणाची जात पहिली नाही जो ज्या कुवतीचा त्या प्रमाणे त्याच्यावर जबाबदारी दिली आणि स्वराज्य उभे केल, त्याच बरोबर आपल्या तालुक्याचे भूषण कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे विचार आपण घेऊन लोक कल्याना करीता आपण सर्वांनी झटणे गरजेचे आहे, शाहीर अमर शेख यांची जन्म भुमी बार्शी आहे म्हणून त्यांचा अखंड महाराष्ट्रचा विचार आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे आणि या करीता मी मराठा समजचा सेवक म्हणून सर्वात पुढे असेल मुस्लिम- मराठा ऐक्य टिकवण्यासाठी आम्ही मराठा समाज सर्वात पुढे असेल असे प्रतिपादन या वेळी केले गुढी पाडवा व रमजान ईद शुभेच्छा देखील या वेळी दिल्या दिल्या.

     तसेच याप्रसंगी युवा व्याख्याते खंडू डोईफोडे यांनी आपल्या मनोगतात मुस्लिम समजणं शिवरायांच्या सोबत स्वराज्य निर्मितीत मोठ योगदान दिलं आहे सुमारे सातशे पठाण सैनिक सामील झाले होते तर देश स्वतंत्र्याच्या लाढ्यतही मोठं योगदान आहे याची अनेक उदाहरणे देत सर्वाना आपल्या भाषणातून मंत्रमुग्ध करून सोडले

      वाहेद पाशा यांनी मुस्लिम समाज स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करतोय पण सातत्याने त्याला कोणत्या न कोणत्या कारणाने टार्गेट केल जातो त्या मुळे समाज आज भयभीत झाला आहे, आम्हाला विनाकारण राजकारणासाठी बदनाम करू नका अशी खंत व्यक्त केली 

काल शुक्रवारी बावी आ. येथे हिंदू मुस्लिम एकता इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद काशीद मराठा सेवक हे होते तर जी.प. शाळेचे मुख्याध्यापक सुनील मगर, युवा व्याख्याते खंडोजी डोईफोडे, बा. न. माजी नगरसेवक वाहेड पाशा,जोतिराम शिंदे गावचे सरपंच अरिविंद करडे, अमृषि पाटील विश्वस्थ वारकरी संसाथा बावी, ह भ. प. श्रीखंडे महाराज, अशोक आगलावे, राहुल आगलावे, भैया पाटील, नागनाथ मोरे, संदीप शिंदे, मच्छिन्द्र ननवरे, हनुमंत भोसले शेतकरी संघटना आध्यक्ष, उल्हास माने, तर या इफ्तार पार्टी करीता मुसा मुलाणी, सलीम शेख, असिफ तांबोळी, समीर सय्यद, गतृद्दीन शेख, मोलाना बावी, अमीर शेख, अशपाक शेख, छबू शेख, दिलावर मुलाणी, अरबाज शेख, सय्यद शेख, शहमद तांबोळी



कार्यक्रमचे सूत्रसंचालन समीर सय्यद यांनी केले तर आभार मुसाभाई मुलाणी यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा