Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ मार्च, २०२५

*सांगवी मार्डी ता. तुळजापूर येथील स्मशान भूमी कडे जाणाऱ्या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करून गुन्हा दाखल करावा ---अमोल जाधव (शिवसैनिक)*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

मौजे सांगवी मार्डी येथील कामाची पूर्ण चौकशी करून गुत्तेदार व अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी शिवसैनिक अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी---- जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांना निवेदनाद्वारे केली असून याबाबत सविस्तर वृत्त असे की

सांगवी मार्डी येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून गतवर्षी करण्यात आला होता या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून वर्षभरातच ह्या रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे पंचवीस पंधरा अंतर्गत आमदार निधीतून १० लाखांचा ह्या रस्त्यात प्रचंड भष्ट्राचार झाला आहे तसेच या रस्त्याचा माहिती फलकावर अपुर्ण माहिती लिहली आहे पाहणी करणाऱ्या अभियंता तसेच ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी ही मागणी निवेदनाद्वारे केली आहे



प्रत माहितीस्तव


१) मा.कार्यकारी अभियंता, सा.बां विभाग, धाराशिव

जिल्हा धाराशिव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा