*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) सोलापूर
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान अंतर्गत (MSRLM)
लोकायत लोकसंचलीत साधन केंद्र अकलूज चा
50 वा माविम वर्धापन व जागतिक माहिला दिन सोलापूर येथे साजरा करण्यात आला.
दि. 10/03/2025 रोजी जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंडे सर यांच्या मार्गदर्शना खाली लोकायत लोकसंचालित साधन केंद्र अकलुज चा माविम 50 वा वर्धापन दिन (सुवर्ण महोत्सवी वर्ष) व जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
माविम 50 वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिन निमित्त बचत गटाचे उत्पादनाचे भव्य प्रदर्शन व जिल्हा स्तरीय बचत गटाचे प्रदर्शन व विक्री चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लोकायत CLF चा कार्यक्रम सोलापूर या ठिकाणी घेण्यात आला. कार्य क्रमासाठी
उपस्थित प्रमूख पाहुणे रमेश काटकर बाल विकास अधिकारी सोलापूर जिल्हा, समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंडे सहा. जिल्हा समन्वयक अधिकारी सतीश भारती अकाउंट ऑफिसर शिला संगेवार, लिपिक तथा सहाय्यक दिपाली आध्यापक, उपजिवीका सल्लागार राजकुमार पवार, AMO संतोष पाटील तसेच तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजित शेंडे LDC उमेश जाधव लोकायत च्या अध्यक्ष प्रतिभा गायकवाड, सचिव संगिता गडदे , खजिनदार परविन तांबोळी, तसेच सर्व कार्यकारिणी लोकायत CLF चे व्यवस्थापक कामिनी ताटे -देशमुख लेखापाल CLF च्या सर्व CRP यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
या महिला दिनानिमित्त बोलताना रमेश काटकर म्हणाले की महिलांसाठी खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले बचत गटांना व महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी योगदान खूप मोठे आहे तसेच जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंडे सरांना लोकायत लोकसंचालित साधन केंद्र अकलूज अंतर्गत चालणारे कामाचे कौतुक केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच CLF अध्यक्ष यांनी माविम विषय आपले मनोगत व्यक्त केले तसेच जय माला सगर यांनी जागतिक महिला दिनाविषयी महिलांना प्रोत्साहन पर भाषण केले त्यानंतर संगीत खुर्ची क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये भाग्यश्री लोकरे यांचा प्रथम क्रमांक आला व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते याचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर प्रमुख पाहुणे जिल्हा तालुका व CLF स्टाफ यांनी केक कापून वर्धापन दिन साजरा केला नंतर लोक आहेतCLF व्यवस्थापक कामिनी ताटे देशमुख यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा