*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
धनंजय मुंडेचा आमदारकी चा राजिनामा घेऊन त्याला सहआरोपी करूण मुख्य आरोपीना फाशीची शिक्षा होणे करीता आज दिनांक 5 मार्च 2025 रोजी तुळजापुर शहर व तालुका अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आला असून बंद ठेवत असले बाबतचे निवेदन तुळजापूरचे तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले आहे
मस्साजोग चे संरपच कै. संतोष (आण्णा) देशमुख याची क्रुररित्या हत्या करण्यात आली या घटनेला ३ महिने झाले तरी यातील "कृष्णा आधळे" हा आरोपी अद्याप फरार असुन त्याला तात्काळ अटक करण्यात यावी व या सर्वाची पाठराखण करणारा आका मंत्री व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता धनंजय मुंडेच जबाबदार असून या करीता त्याच्या आमदारकी चा ही राजिनामा घेऊन त्याला सहआरोपी करूण मुख्य आरोपीना फाशीची शिक्षा होणे करीता व महाराष्ट्राची शांतता व सुव्यस्था अबाधित राहण्या करीता कडक पाऊले उचलावित याकरीता तुळजापुर शहर व तालुका १ दिवस बंद ठेऊन धाराशिव जिल्हा बंद मध्ये सामिल होत आहे.
तरी सर्व आरोपीचा खटला जलद गति न्यायालयात दाखल करूण महाराष्ट्रातील गुंड प्रवृतीच्या राजकारण्याना व त्याच्या बगल बच्यांवर अंकुश घालण्या करीता नराधमाना फाशीची होण्याच्या दृष्टीने कडक पावले उचलावीत. अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने तालुका बंद ठेवून तसेच तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा