Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३१ मार्च, २०२५

अकलूज येथे "रमजान ईद" निमित्त ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजाने केली ईदची नमाज अदा.


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

अकलूज येथे नीरा नदी काठी असलेल्या भव्य ईदगाव मैदानावर अकलूज आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद (ईद-उल- फितर) ची नमाज मोठ्या उत्साहाने साजरी केली 

      रमजान ईद ची नमाज, खुदबा, आणि तकरीर (प्रवचन )मदिना मस्जिद काजी गल्लीचे मौलाना महमूद रिझवी यांनी अदा केली 

      ईद निमित्त बोलताना मौलाना मेहमूद म्हणाले की महिनाभर रोजा उपवास करून आज सर्व मुस्लिम बांधव रमजान ईद साजरी करत असून महिनाभर केलेल्या रोजाचे फलित अल्लाह रोजदारांना आज देत असतो , महिनाभर रोजदारांना विविध समाजातील बांधवांनी इफ्तार पार्टी देऊन एकता आणि समतेचा संदेश दिला त्यामुळे ही देशातील संस्कृती टिकून राहणे ही काळाची गरज आहे



        रमजान ईद ची ये ईदगाह वर शुभेच्छा देताना माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील सहकार महर्षीपासून आजपर्यंत आपल्या भागातील एकोपा आजही टिकून आहे तो असाच टिकून राहावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो तसेच त्यांनी मोहिते पाटील परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या .

   याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्तीर्ण झालेल्या आणि प्राविण्य कमावलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे हे हिंदू समाजाचे असूनही मागील सोळा वर्षापासून रमजानची महिन्याचे रोजी करत असतात विशेष बाब म्हणजे ते स्वतः पहाटे तीन वाजता उठून मुस्लिम समाजातील बांधवांना रोजा करण्यासाठी जागे करत असतात त्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला



       या ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच -किशोर सिंह माने पाटील ,उपसरपंच -पांडुरंग भाऊ देशमुख, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निंभोरेसाहेब पोलीस उपनिरीक्षक साळुंखे साहेब आदि मान्यवर उपस्थित होते 

     ही रमजान ईद ची नमाज पार पडण्यासाठी अकलूज पोलीस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच अकलूज नगर परिषद चे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नगर परिषदेच्या वतीने ईदगाह मैदानावर साफसफाई करून मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी स्वच्छता केली होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा