कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान ईद ( ईद-उल-फितर ) परिसरात सामुहिक नमाज पठण, एकोपा, भाईचारा पाळत साजरा करण्यात आला. यावेळी एकमेकांना आलिंगन देत गोड शिरखुर्मा व गुलगुले चारून तोंड गोड करण्यात आले. तर समाजातील हालाखीची परिस्थिती असणाऱ्या सर्वांना सहिसलामत ठेवावे अशी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. देश व मानव जातीच्या कल्याणासाठी व उत्कर्षासाठी शांतता राखत काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
बावडा येथे मौलाना मुख्तार शेख यांनी समाज बांधवांना सामुहिक नमाज पठण व प्रार्थना केली. यावेळी परीसरातील गावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आरिच मुलाणी, अरूण गायकवाड, पंकज महाजन, तात्या गायकवाड यांनी पवित्र रमजान महिन्याचे उपवास केल्याबद्दल त्यांचा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हार, टोपी, शाल देवून सन्मान करण्यात आला. यावेळी उदयसिंह पाटील, मनोज पाटील, किरण पाटील, रणजित गिरमे, रणजित घोगरे आदि मान्यवर उपस्थित होते.
लुमेवाडी येथील ईदगाह मैदानावर दर्गाह मस्जिदचे इमाम अफरोज रजा यांनी नमाज पठण करून उपस्थित समाज बांधवांना नमाज व कुराणचे महत्व विषद केले. तसेच हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या दर्गाहमध्ये समाज बांधवांनी सामुहिक प्रार्थना केली. देश व मानव जातीच्या कल्याणासाठी व उत्कर्षासाठी शांतता राखत काम करण्याचे आवाहन करण्यात आले. तर पिंपरी बुद्रुक येथे मौलाना तय्यब शेख यांच्या पाठीमागे समाज बांधवांनी नमाज पठण व सामुहिक प्रार्थना केली.
नरसिंहपूर परिसरात मुस्लिम बांधवांनी सर्व धर्मातील नागरिकांना शिरखुर्मा व गुलगुलेचा फराळ देवून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
फोटो - बावडा येथील ईदगाह मैदानावर मौलाना मुख्तार शेख यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पठण व प्रार्थना केली.
----------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा