*इक्बाल बाबासाहेब मुल्ला --सांगली*
*मो:-8983 587 160
रमजान ईद हा आनंदाचा - त्यागाचा शुभदिवस आहे तथापि ही ईद यशस्वी करण्यासाठी ,रमजानचे 30 रोजे यशस्वी करण्यासाठी रात्रीची झोपमोड करून दररोज पहाटे 3 वाजता उठून जेवण करणाऱ्या आपल्या घरातील महिलांचे कौतुक आपण कधी करणार ?? सर्व घरातील पुरुषांनी या महिलांना सर्वप्रथम Thank You म्हणायला हवे,आणि "ईद मुबारक" म्हणायला हवे. हा सन्मान त्यांना मिळायलाच हवा.
रोजे पूर्ण करण्यासाठी रात्री 12 - 1 वाजता झोपून पुन्हा 3 वाजता "उठणे" सोपे नाही.परंतु "फर्ज" असणारे रोजे होण्यासाठी , अल्लाहला"राजी" करण्यासाठी, रक्ताचे पाणी करणाऱ्या,घरातील अन्य सदस्य सुखाची झोप घेत असताना स्वतः सर्व त्रास सहन करून घरातील कुटुंबासाठी पहाटे जेवण बनवणाऱ्या आपल्या आई - पत्नी यांचे उपकार आपण विसरता कामा नयेत. त्यांचे "आभार" समस्त पुरुषवर्गांनी मानायलाच हवेत. समस्त महिलावर्गाना "मानाचा मुजरा" !
Thank You
आ. *इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली .
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा