*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर जिल्हा जिजाऊ ब्रिगेडची संग्रामनगर येथे मिटींग होऊन त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील नवीन पदाधिका-यांची निवड करण्यात आली आहे.त्याचे नियुक्ती पत्र जिजाऊ ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हाच्या अध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडची आज माळशिरस तालुका कार्यकारिणी मिटींग पार पडली.यामध्ये माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षपदी शिवमती शारदा चव्हाण,तालुका उपाध्यक्षपदी शिवमती आशा सावंत,सचिवपदी शिवमती पूनम सुसलादे,कार्याध्यक्षपदी शिवमती सुवर्णा क्षीरसागर व शिवमती कल्पना चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.तर जिल्हा प्रवक्तेपदी सुवर्णा घोरपडे यांची निवड करण्यात आली.त्याचे नियुक्ती पत्र सोलापूर जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड यांच्या हस्ते व शिवमती आक्काताई माने यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा