Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ११ मार्च, २०२५

*तुळजापूर तालुक्यातील वाढत्या मादक पदार्थाच्या तस्करीमुळे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे एका निरापराध व्यक्तीचा बळी!...*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा तुळजापूर तालुक्यात ड्रग्ज तस्करी करणारे तस्कर पोलिसांच्या जाळ्यात सापडले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून आई तुळजाभवानी मातेचे गाव पुन्हा चर्चेत आले मागील तीन ते चार महिन्यापासून तुळजापूर तालुक्यात ड्रग्ज तस्करी चालत होते याचा मागोवा पोलीस प्रशासनाला लागला नसेल का? कारण अशा वेळी पोलीस प्रशासनाचे गोपनीय विभाग काय करत होते ?हा संशोधनाचा प्रश्न आहे प्रसिद्धी माध्यमातून झालेल्या उठावानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या महाराष्ट्र प्रसिद्ध असलेले तुळजापूर हे तीर्थक्षेत्र या मादक पदार्थाची तस्करी करूनअवैध धंदे करणाऱ्या मुळे बदनाम होत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून ही चिंताजनक बाब आहे वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न हा गहण बनला असून विविध प्रकारचे नशा करणाऱ्या मध्ये गुंड आणि गुन्हेगार प्रवृत्तीचे टवाळखोर दिवसाढवळ्या मादक पदार्थाच्या नशे मध्ये सर्वसामान्यता आणि निष्पाप व्यक्तींचा खून करत असून सिंदफळ ता.तुळजापूर येथे दिनांक 5 मार्च 2025 रोजी तुळजापूर बार्शी रोडवरील मुदगलेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील शेतात एका निरापराध शेतकऱ्याच्या या नशेबाज 4 युवकांनी नशेच्या धुंदीत पाठीमागून मोटार सायकलचा रॉड मारून निर्घृणपणे खुन केला त्या खून झालेल्या व्यक्तीचा काय गुन्हा होता? ज्या व्यक्तीचा खून झाला तो व्यक्ती सरळ मार्गी होता एकाने निरापराधाचा खून झाल्याने तुळजापूर आणि सिंदफळ परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत असून तुळजापूर तालुक्यात वाढत्या मादक पदार्थाच्या तस्करीमुळे पहिला बळी गेला असून त्याच्या पश्चात दोन मुली एक मुलगा दोन पत्नी असून मुलं आणखी शिक्षण घेत आहेत अशा नशेबाज युवका मुळे मुलांना आपला वडील, पत्नीला आपला पती, गमवावा लागला आणि अशा गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांमुळे त्यांच्या घराचा आधार गेला या घटनेला जबाबदार कोण?

    जर अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांवर पोलीस प्रशासनाचा जरब असता तर अशा घटना घडल्या नसत्या हे पोलीस प्रशासनाचा नाकर्तेपणा दिसून येत आहे तुळजापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गृह खात्याचे "तीन तेरा नऊ अठरा" झाले असून उठसुठ कोणीही महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणे त्यांचा अनादर करणे किंवा वादग्रस्त वक्तव्य करणे हे राज्यातील भाईचारा आणि संस्कृतीला घातक आहे तसेच पोलीस प्रशासनाचे गुन्हेगारावर वचक न राहिल्यामुळे दररोज कोठे ना कोठे गुन्हेगारी घटना घडत असून त्यामध्ये 90% गुन्हे राजकीय नेत्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून घडत असून त्यांना राजकीय अभय असल्याने ते गुन्हे करण्याचे धाडस करतात आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्ष पणामुळे मोकाट फिरतात आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव नाहीतर काय? पूर्वी संपूर्ण देशात गुन्हेगारी बाबत बिहार अग्रेसर होते त्याबाबत सर्वत्र बिहारची चर्चा होत असे हे सर्वश्रुत आहे मात्र महाराष्ट्राने बिहारला मागे टाकले असून बिहार पेक्षाही महाराष्ट्राची गुन्हेगारी प्रवृत्ती चे चर्चा होत आहे 

     शेवटी गृहमंत्र्यांना गृह खाते गृहखात्याची जबाबदारी पेलत नसेल तर मंत्रिमंडळातील सक्षम मंत्र्याला गृह खाते देऊन या जबाबदारीतून मुक्त व्हावे जेणेकरून महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल आणि निरापराधाचा जीव जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा जनता कदापी शासन करताना माफ करणार नाही 

     जनतेकडे खूप संयम आहे जर संयमाचा बांध तुटला तर.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा