Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ११ मार्च, २०२५

*तुळजापूर येथील' यात्रा मैदान' संदर्भात -उपमुख्यमंत्री- एकनाथ शिंदे यांची धाराशिव चे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून तात्काळ अहवाल पाठवण्याची दिलै आदेश !..*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

धाराशिव रोडलगत तुळजापूर शहरात मैदानासाठी आरक्षित सात एकर जागा. असून १९८९ साली शासनाने ही जागा यात्रा मैदानासाठी राखीव ठेवली होती. काही पुढाऱ्यांनी सत्तेच्या खुर्चीवर बसताच ठराव बदलला, फेरफार गायब झाले आणि डुप्लिकेट पीआर कार्ड तयार करून यात्रा मैदानात काही प्लॉट विक्री केली आहे.असे अरारोप करीत शहरातल्या महिलांनी दि.३मार्च रोजी तळजापूर तहसिलदारांना निवेदन देवून आमरण उपोषण ही केले 


निवेदनात असे नमूद केले आहे की,यात्रा मैदानच्या जमिनीवर महाराष्ट्र शासन नाव लागत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार.असुन

निवेदन देताना शहरातील असंख्य महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या तुळजापूर तहसील कार्यालय समोर शहरातील महिलांचे आमरण उपोषण. आज दिनांक 3 मार्च 2025 रोजी चालू झाले मात्र नगरपरिषद तुळजापूर आणि तहसील कार्यालय तुळजापूर यांनी उपोषणकर्त्या महिलांना लेखी पत्र देऊन त्या पत्राद्वारे उपोषणकर्त्या महिलांना आश्वासित केले आहे की ,

  तुळजापूर येथील सर्वे नंबर 138/1 मधील वाहनतळ या आरक्षणाबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणे करता अर्ज केला आहे सदर प्रकरणात संदर्भ क्रमांक 1 अन्वये सदर प्रकरणात उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार व तहसीलदार तुळजापूर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आलेली आहे व सदर समिती अंतर्गत चौकशी चालू असून पुढील सुनावणी 20 मार्च 2025 पासून सदर चौकशीच्या अंतिम निर्णयानंतर पुढील कार्यवाही नगरपरिषद व तहसील कार्यालया द्वारे करण्यात येईल तसेच या त्रिसदस्य चौकशी अहवालानंतर विषयांकित प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केले सदर प्रकरणी 20 मार्च 2025 पर्यंत याबाबत कार्यवाही नाही झाली तर परत आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे

    त्या अनुषंगाने तुळजापूर येथील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संभाजी नेपते , अमोल जाधव संजय लोंढे काका चिवचिवे, भुजंग मुखेडकर यांनी काल दि.10 मार्च 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली असता त्यांनी धाराशिव चे जिल्हाधिकारी यांच्याशी फोन वरून संपर्क साधून चर्चा केली आणि यात्रा मैदाना संदर्भात तात्काळ अहवाल पाठवण्याचे आदेश देण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा