*माळशिरस--प्रतिनिधी*
*रामचंद्र --मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
निमगाव( म) ता.माळशिरस येथील ग्रामपंचत हद्दीतील गावतील सर्व्हे नंबर ५८६ मधील आङावर अतिक्रमण करण्याचे काम चालु आहे ते अतिक्रमण काढून टाकुण पुरातन ठेवा जपुन ठेवावी आशी मागणी सामाजिक कार्यकर्ते- कालिदास मगर यांनी ग्रामपंचत निमगाव व पंचायत समिती माळशिरस, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असुन हे अतिक्रमण न हटविल्यास आंदोलन करण्याचा इशारा माळशिरस पंचायत समितीचे गटविकास आधिकारी ङाॅ.आबासाहेब पवार यांना निवेदन द्वारे देण्यात आले आहे
पुर्वी गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावाच्या ठराविक भागामध्ये आङ खोदुन चिरेबंद दगङांनी कोरीव बांधकाम केरून त्यावर रहाट बसविले होते त्या पाणी बादली द्वारे काढुन पिण्यासाठी वापरले जात होते आता सुध्दा दुष्काळजन्य परिस्थिती उद्भभवल्यास त्या आङवर मोटर टाकुन गावाला पाणी पुरवठा केला आहे माञ पुरातन.आड हा. गावाची ओळख असलेल्या आडावर अतिक्रमण करून पुसण्याचा जोरदार प्रयत्न चालु आहे तो त्वरित थांबवावा न थांबवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा