*यशवंतनगर --प्रतिनिधी*
*नाझिया मुल्ला*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
पुन्हा एकदा जागर.
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रियंका शिंदे तालुका वैद्यकीय अधिकारी , माळशिरस, यशवंतनगर केंद्राच्या केंद्रप्रमुख महादेवी गुंड, संजय मुंगसे मुख्याध्यापक रात्र प्रशाला उपस्थित होते.
प्रथम सर्व महिलांना मानाचा फेटा बांधून सर्वांचे प्रवेशद्वारावर औक्षण करण्यात आले.
महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि योगदानाचा सन्मान करण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रसंग असल्याचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले.
प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील उर्फ अक्कासाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सर्व महिलांचा सन्मान समारंभ मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर संपन्न झाला.
प्रशालेतील सहशिक्षक किरण सूर्यवंशी यांच्या कल्पक विचारसरणीतून महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेत कांचन बोरावके प्रथम क्रमांक ,स्नेहलता एकतपुरे व वर्षाराणी तुपे द्वितीय क्रमांक व सोनाली चौधरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या फलक लेखन स्पर्धेत विजेत्या महिला भगिनींसाठी बक्षीस दाते म्हणून प्रथम क्रमांक अंकुश एकतपुरे ,द्वितीय क्रमांक गुलाब कोठावळे व तृतीय क्रमांक अनिल मोहिते यांच्याकडून बक्षीस ट्रॉफीचे वितरण करण्यात आले.
प्रशालेतील विद्यार्थी जय एकतपुरे याने महिला दिनाचे मनोगत व्यक्त केले. प्रशालेतील सहशिक्षक गणेश जाधव यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीत महिला दिनाचे महत्त्व सांगितले.
प्रतिभा राजगुरू यांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे आभार व्यक्त केले.
आधुनिक काळात महिला चुल व मुल याला पाठीमागे टाकून मोबाईल व माऊस या तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे डॉ.प्रियंका शिंदे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
केंद्रप्रमुख महादेवी गुंड यांनी आपल्या मनोगतातून कर्तबगार महिलांच्या शौर्याला उजाळा दिला.
महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थिनींनी कर्तबगार महिलांच्या भूमिका साकारल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सोनवणे व बिभीषण जाधव यांनी केले तर आभार चंद्रशेखर दुपडे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा