*पन्हाळा --प्रतिनिधी*
*प्रा-विश्वनाथ पाटील*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
कोडोली / ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर: तारीख : २९: " आज समाजातील नैतिकता ढासळत आहे. या पार्श्वभूीवर शिक्षकांनी आपली नैतिकता जपत चांगले विचार ठेवल्यास स्थित्यंतराचे आव्हान पेलणे शक्य होईल ", असे प्रतिपादन शाहुवाडी ( जि. कोल्हापूर ) येथील ज्येष्ठ पत्रकार आनंदराव केसरे यांनी आज येथे बोलताना केले. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय ( बी. एड. कॉलेज ) मध्ये व्दितीय वर्षाच्या विद्यार्थी - शिक्षकांना सदिच्छा देण्याच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
संस्थेच्या अध्यक्षा पद्मजा पाटील यांच्या मातोश्री कमल देसाई ( कराड, सातारा) यांच्या निधनानिमित्त त्यांना कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रध्दांजली अर्पण केली. महाविद्यालयाच्या ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवादच्या विद्यार्थ्यानी संपादित केलेल्या यशवंत अर्धदैनिकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. व्दितीय वर्षांच्या विद्यार्थी - शिक्षकांनी महाविद्यालयास महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन यंत्र भेट दिले. तसेच शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद तसेच बालवाडी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यानी महाविद्यालयास दिलेल्या भेटवस्तुंचा प्राचार्यांनी स्वीकार केला . प्रथम वर्षाच्या विद्यार्थी - शिक्षकांनी व्दितीय वर्षाच्या विद्यार्थी - शिक्षकांसाठी अन्नदान केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले , की आज माणूस यंत्रासारखा वागू लागला आहे. त्याच्यात सुधारणा करायची असेल तर हाडामंसाचा शिक्षकच सुधारणा करु शकेल. कृत्रिम बुद्धिमत्ता नैतिकता निर्माण करु शकणार नाही .
हि
यावेळी प्रा. एस. डी. रक्ताडे यांच्यासह स्मिता कळंत्रे , सुभाष चौगुले, अभिजित कांबळे, सुरेश तेलवणकर, भिवाजी कांबळे , अनिरुद्ध कांबळे यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. साई नलगे यांनी प्रास्तविक केले. सरिता कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. जी. जाधव यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा