*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- : इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे
आमदार व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसा शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाने पारित केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय क्रमांक जिपार्म- १३२४/प्र.क्र.४७/२.वका.-२. दि.१८.०१.२०२५, यामध्ये अंशतः बदल करुन मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती करण्यात येत असल्याचे परिपत्रक बुधवारी (दि.२६) काढण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे इंदापूरचे आमदार व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा