*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
यशवंतनगर येथील शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आरोह गणेश ननवरे याची नवोदय विद्यालय, पोखरापूर येथे निवड झाली आहे. 18 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेत आरोहने हे यश मिळवले. इयत्ता सहावी साठी त्याची निवड झाली आहे पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालय पोखरापूर येथे त्याला इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण मोफत मिळणार आहे नवोदय विद्यालय केंद्र सरकार मार्फत सीबीएससी शिक्षण पद्धतीने अभ्यासक्रम राबविला जातो त्याच्या या यशाबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक कार्याध्यक्ष खासदार मा.श्री धैर्यशील मोहिते पाटील साहेब, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मा सौ शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री प्रदीपकुमार करडे साहेब,सचिव धर्मराज दगडे सर, शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचे चेअरमन मा श्री रामकृष्ण काटकर सर आणि मुख्याध्यापक मा. श्री जितेंद्र पांडुरंग माने देशमुख सर यांनी भरभरून कौतुक केले.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून त्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा