*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे खासदार अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्याबाबत मोठे विधान केले आहे. प्रयागराजमधील महाकुंभमधून १००० हिंदू भाविक बेपत्ता झाल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला. तसेच केंद्र सरकारने महाकुंभसाठी किती निधी दिला होता? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
अखिलेश यादव नेमके काय म्हणाले?
अखिलेश यादव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केवळ गाड्यांची पार्किंग सांभाळत होते. तर अनेक आयपीएस अधिकारी सामान्य लोकांना स्नान करण्यापासून रोखत होते. अनेक भाविकांना तर सीमेवरच अडविण्यात आले. महाकुंभमध्ये सामान्य लोकांना काय सुविधा दिल्या गेल्या, याबाबत सरकारने काहीही सांगितलेले नाही.”
“इतिहासात पहिल्यांदा असे झाले आहे की, सर्वाधिक नुकसान हिंदू भाविकांचे होत आहे. अद्यापही १००० हिंदू भाविक बेपत्ता आहेत. मात्र सरकार त्यांची कोणतीही माहिती देत नाही. उलट बेपत्ता लोकांची पत्रके हटविण्यात येत आहेत”, असा आरोप करत असताना अखिलेश यादव म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकारने बेपत्ता लोकांना शोधून त्यांच्या कुटुंबांना दिलासा दिला पाहिजे.
पंतप्रधान मोदींनी केले महाकुंभचे कौतुक
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदेत महाकुंभमेळ्याबाबत आपली भूमिका मांडली. महाकुंभ देशाच्या एकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. “महाकुंभ दरम्यान संपूर्ण देश एकजूट झालेला पाहायला मिळाला. लाखो भाविक सुविधा-असुविधा याची चिंता न करता प्रयागराजला आले. हीच आपली मोठी ताकद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा