Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ५ मार्च, २०२५

*श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालयात "रत्नाई महोत्सवास "प्रारंभ*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व एस.एन.डी. टी.महिला विद्यापीठ संलग्नित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय येथे रत्नाई महोत्सव २०२४-२५ ची सुरु झाला आहे. 



             या रत्नाई महोत्सवाच्या निमित्ताने विविध डेज जसे की फेटा डे,रिजनल डे,बॉलिवूड कॅरेक्टर डे,सारी डे,ट्विन्स डे असे विविध डेज साजरे केले जात आहेत.या सोबतच या निमित्ताने बेस्ट स्टूडेंट ऑफ द इयर,गायन स्पर्धा,नृत्य स्पर्धा, फॅशन शो,पालक सभा अशा अनेक स्पर्धा व उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. फेटा डे,रिजनल डे तसेच वेस्टर्न डे निमित्ताने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी विविध संकल्पनेतून हे विविध डेज साजरे केले आहेत.

       हा रत्नाई महोत्सव महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सभापती कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित केला आहे.यासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.छाया भिसे,डॉ.अमित घाडगे,डॉ. भारती भोसले,डॉ. राजश्री निंभोरकर,डॉ.जयशीला मनोहर,डॉ.ऋषि गजभिये तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी परिश्रम घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा