*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूरचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लांमगुंडे सर यांच्या मार्गदर्शना खाली सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र यशवंतनगर (शंकरनगर )यांनी हॉटेल गिरमे माळेवाडी या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळाचा 50 वर्धपान दिन (सुवर्ण महोत्सवी वर्ष ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य सौ. सुनंदाताई फुले, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक रणजीत शेंडे सर,बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक महेश गव्हाणे,बँक ऑफ इंडिया शाखा माळेवाडी शाखाचे व्यवस्थापक दिपक खोटे,बँक ऑफ इंडिया शाखा अकलूजचे प्रज्वल सर व सीएमआरसीच्या अध्यक्षा सौ.जयश्री एकतपुरे व सचिव राजश्री जाधव हे उपस्थितीत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर रणजित शेंडे सर यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यानंतर सीआरपी अश्विनी गिरमे,अध्यक्ष जयश्री एकतपुरे, कोषाध्यक्ष कौसर शेख,सचिव राजश्री जाधव,आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर शाखा व्यवस्थापक गव्हाणे साहेब, सुनंदाताई फुले मॅडम यांनी उपस्थित महिला यांना मार्गदर्शन करून सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये रिकाम्या बाटलीत पाणी भरणे,फुगे फुगवणे,तळ्यात मळ्यात,संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा घेतल्या. महिलांनी सामूहिक व वैयक्तिक डान्स करून कार्यक्रमाची सांगता केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीएमआरसीच्या व्यवस्थापक तनुजा पाटील, लेखापाल सविता क्षीरसागर, एलडीसी आकाश लोंढे, क्षेत्रसमन्व्यक रिजवाना शेख,वैशाली कांबळे,मनीषा गवळी,महेश मदने व रुकसाना काझी,विविध ग्रामसंघाच्या कार्यकारणी व लेखापाल, सीआरपी व महिला वर्ग यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा