Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २ मार्च, २०२५

*अकलूज येथे डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान संपन्न.*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

रेवदंडा (ता.अलिबाग) येथील 

महाराष्ट्र भूषण तिर्थरूप डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे सौजन्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.११२५ श्री.सदस्यांनी अकलूज शहरातील सुमारे ३३ टन कचरा गोळा केला आहे.

         पद्मश्री मा.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार अकलूज शहरातील परिसर स्वच्छता अभियानास गांधी चौक,महर्षी चौक,प्रतापसिंह चौक,जयसिंह चौक,विजय चौक,जुने एसटी स्टँड,आझाद चौक,महावीर स्तंभ,महाराणा प्रताप चौक अशा नऊ ठिकाणावरून एकाच वेळी स्वच्छता अभियानला सुरुवात करण्यात आली होती.  



          अकलूज नगरपरिषदेच्या सहकार्याने विविध ९ ठिकाणी ११२५ श्री सदस्यांनी २८ वाहन, १ जेसीबीच्या सहाय्याने ३३ टन कचरा गोळा करुन कचरा डेपोत पाठविला.यावेळी या अभियानात श्री सदस्यांसह केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड व डॉ अजित शहा यांनी सहभाग घेतला.डॉ.श्री.धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अकलूजसह पंढरपूर,सांगोला,मंगळवेढा, तसेच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.

                डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियाना बरोबर रक्तदान शिबिरे,निर्माल्य संकलन व निर्मल्यापासून खत निर्मिती, वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन,जल पुनर्भरण,आरोग्य शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन आदी सामाजिक उपक्रम राबविले जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा