*अकलूज --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज केंद्राच्या सेवानिवृत्त केंद्र प्रमुख ज्योती प्रकाश नलवडे यांचे शिर्डी येथे अपघाती निधन झाले.त्या मृत्यू समयी त्या ६४ वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली,सुन, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.त्या माजी केंद्र प्रमुख प्रकाश नलवडे यांच्या पत्नी होत्या.
शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनासाठी जात असताना. रस्त्यावर मोटासायकल स्वाराने जोरदार धडक दिल्यामुळे दहा दिवस मृत्यू झुंज देत असताना निधन झाले आहे.त्यांनी अकलूज जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस असताना शिक्षीका,मुख्याध्यापिका,केंद्र प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला होता.त्याच्या मार्गदर्शनखाली शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थींनी यश संपादन केले होते.त्यांच्या पानगाव (ता.बार्शी) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा