Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

*विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर अनंत उपकार --सुरज वनसाळे*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी लासुर्णे गावातील आठदारे येथे दोस्ती मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

       या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे संस्थापक सुरजभैय्या वनसाळे होते. त्यांनी स्वतःचे विचार मांडताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर खुप उपकार असुन त्यांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे असे मत व्यक्त केले.

      यावेळी नील ध्वजारोहण लासुर्णे ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष (पिपा) लोंढे व ग्रामपंचायत सदस्य वामन वाघमारे यांच्या हस्ते नील ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी सुरजभैय्या वनसाळे,संतोष पिपा लोंढे, वामन वाघमारे, झेंडे, अनिल वाघमोडे, समाधान अहिवळे, वैष्णवी बनसोडे उपस्थित होते. तर सुत्र संचालन सामाजिक कार्यकर्ते पोपट आठवले यांनी केले.


          यावेळी दोस्ती मित्र मंडळाचे सर्व सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा