*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आंबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
लातूर एमआयटीच्या दंत वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय संभाजी मुंडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 699 चा रँक प्राप्त करून यश संपादन केल्याबद्दल लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक आ रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
बालपणीची वडीलाचे छत्र हरवले असताना आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने मेहनत करून गोपीनाथगड पांगरी येथील अक्षय संभाजी मुंडे यांनी अत्यंत बेताच्या परिस्थितीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत 699 चा रँक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले. तत्पूर्वी 2013 - 14 या शैक्षणिक वर्षात लातूर येथील एमआयटीच्या दंत वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले सदरील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश संपादन केल्याबद्दल लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशआप्पा कराड यांनी अक्षय मुंडे यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विक्रमकाका शिंदे, वसंतराव डिघोळे, नवनाथ भोसले, रघुनाथ केंद्रे, अभिषेक आकनगिरे, सचिन मुंडे, अँड मनोज कराड, प्रमोद घुगे, संजय डोंगरे यांच्यासह इतर अनेक जण होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा