*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सोलापूरातील मोदी येथे हुडको कॉलनी परिसरात रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास पिण्याचे पाणी आले असता तेथील राहिवासी मयूर भुताळे व त्यांची आई पाणी भरण्यासाठी उठले असता त्यांना पाण्याच्या टिपेजवळ एक सर्प निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ सोलापूरचे निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच सर्पमित्र भीमसेन लोकरे हे तात्काळ त्याठिकाणी पोहचून पाहणी केली असता, तेथे अत्यंत "दुर्मिळ असा 'दूरक्या' घोणस" जातीचा बिनविषारी सर्प आढळून आला.
त्या सर्पास सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी सुरक्षितरित्या पकडले.
दरम्यान सोलापूरात उन्हाचा तडाखा व उष्णतेची तीव्रता खूपच वाढली असल्याने अनेक प्रजातीचे सर्प थंड वातावरणाच्या शोधात बाहेर पडतात. व आपल्या घरपरिसरात पाण्याची व अढगळीची जागा शोधून तेथे जाऊन बसतात.
दुर्मिळ डुरक्या घोणस हा प्रथमदर्शी अजगरासारखा भासतो त्या मुळे नागरिक त्याला अजगराचं पिल्लू समजतात. शिकार करत असताना हा साप आपल्या भक्षाचा जीव गुदमरेपर्यंत त्यास घट्ट आवळून पीळ मारतो आणि त्या नंतर भक्ष पूर्णपणे मेल्यानंतर त्याला खातो. दूरक्या घोणस सापाचे शेपूट कानसाप्रमाणे आणि करवतीप्रमाणे खरखरीत कारल्या सारखे टोकदार असते. भुसभुशीत जमिनीतील माती अंगावर ओढून त्याच्याखाली तो लपतो. या सापाच्या डोक्याचा आकार विषारी घोणसप्रमाणे असतो. त्याला हाताळल्यास सुरुवातीला हल्ला करतो. त्याचे दात अतिशय तीक्ष्ण असतात.
अशी महत्वपूर्ण माहिती सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा