Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ मे, २०२५

*अकलूज येथे सदाशिवराव माने विद्यालयात "महाराष्ट्र दिन" उत्साहात साजरा*

 


*अकलूज.-- प्रतिनिधी*

*शकूरभाई --तांबोळी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गौरव गीत गाऊन जयघोष केला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेत उच्च माध्यमिक विज्ञान विभागात व विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविलेला अरबाज बागवान याच्या हस्ते व शि. प्र. मंडळ अकलूज चे संचालक बाळासाहेब सणस, शाळा समितीचे इक्बाल काझी, आप्पासाहेब मगर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी सयाजीराजे वाद्यवृंदाने राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीताचे गायन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी केले. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनेक महान संत यांच्या विचारांनी निर्माण झालेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष होऊन गेले आहेत असे सांगून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा इतिहास, कामगार दिनाचे महत्व, विद्यालयाच्या निकालाची उज्वल परंपरा, विविध उपक्रम, कला, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी याची माहिती देऊन १ मे महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 


 *विद्यालयाचा निकाल* 

*🔸इ. ५ वी ते ९ वी- ९९.३०%*

 इ. ११ वी- ९९.७०% (विज्ञान, वाणिज्य, कला, व्यवसाय)*

 उच्च माध्यमिक विभागात १७ पैकी १५ विषयात संस्थेत विद्यालयाचे प्रथम क्रमांक. माध्यमिक विभागात इयत्ता ९ वी मध्ये संस्थेत गणित विषयात विद्यालयाचे २ विद्यार्थी प्रथम*


यानंतर वार्षिक निकालाचे वाचन करण्यात आले. यामध्ये विद्यालयातील गुणवंत विद्याyर्थ्यांना संस्थेच्या व विद्यालयाचे वतीने देण्यात येणाऱ्या रोख बक्षीसाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच क्रीडा विभागातील विभाग, राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर यश मिळविलेल्या खेळाडूंना संस्थेच्या वतीने प्राप्त झालेल्या रु. ४८०००/- बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. 


शासनाच्या निपुण महाराष्ट्र कृती उपक्रमांतर्गत अध्ययन क्षमता विकसित केलेल्या विद्यार्थ्यांचे चावडी वाचन घेण्यात आले.


अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब सणस यांनी ‘महाराष्ट्र दिनाच्या’ व ‘कामगार दिनाच्या’ व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेत यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमास शिक्षक पालक संघांचे सदस्य, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, शिक्षक प्रतिनिधी, पर्यवेक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालक, बहुसंख्य विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट पवार, निकालाचे वाचन राजन चिंचकर, असिफ झारेकरी, अलिशा काझी यांनी केले. आभार धनंजय मगर यांनी मानले. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत, वैभवशाली इतिहास जपत,प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यानंतर वर्गनिहाय वार्षिक निकालचे वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा