Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

गणेशगांव येथे मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न.*

 


उपसंपादक- नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी


माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार उत्तमराव जानकर यांच्या कल्पनेतून व सहकार्याने माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.




       या शिबिरात गावातील २०० लोकांचे डोळे तपासणी करण्यात आली आहे.त्यामधील ६० लोकांना मोफत नंबरचे चेष्मे वाटप करण्यात आले तसेच २४ लोकांचे मोतिबिंदू निदान झाले असून सदरील मोतिबिंदूचे ऑपरेशन येणाऱ्या आठ दिवसात आमदार उत्तमराव जानकर यांच्या सहकार्याने केली जाणार आहेत.सदर आरोग्य शिबीरास गावातील युवकांनी पुढाकार घेऊन शिबीर यशस्वी होण्यासाठी भरपूर योगदान दिले,अमोल पणासे यांनी मार्गदर्शन केले. तसेच माऊली मदने,दशरथ मोरे, गणेश यादव,विजय यादव,नसीर शेख,नौशाद शेख,बंटी मोरे, जयवंत सोलनकर,विलास नलवडे यांनी हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा