Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २ एप्रिल, २०२५

*सांगली येथे ईदगाह वर पैसे( चंदा) न जमण्यासाठी खेळायला गेला गनिमी कावा?* *चंदा न घेण्यासाठी आदेश देणारा "आका" कोण?*

 


*सांगली ---इकबाल बाबासाहेब मुल्ला*

 *मो:-8983 587 160

ईदगाह मैदानावर" नमाजपठण करण्यासाठी, "पुण्यकार्य" करण्यासाठी आणि *प्रेषित मोहम्मद पैगंबर* यांचे आदर्श "सुन्नत" अदा करण्यासाठी सर्व मुस्लिम समुदाय जमलेला असतो. *दानधर्म* करून, गळाभेट करून, एकमेकांना "शीरखुर्मा" देत मुस्लिम समाज ईद उत्साहात साजरी करत असतो. तथापि काल ईदगाह मैदानावर *चंदा* घेण्याची जी "उज्वल "परंपरा" होती त्याला *छेद* देण्याचा "अयशस्वी प्रयत्न" झाला. 

गेले कित्येक वर्ष ईदगाह मैदानात नमाजपठण झाल्यानंतर जमलेले मुस्लिम बांधव *स्वइच्छेने* चंदा देतात. परंतु काल अचानक चंदा घेण्यासाठी तरुणांना पूर्वनियोजितपणे *रोखण्यात* आल्याचे समजते. सांगलीच्या इतिहासात हा प्रकार "पहिल्यांदाच" घडलेला आहे .

हा *कुटील डाव* असताना कोणीही कार्यकर्ता - नेता समोर आलेला नसताना सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या *इम्रान जमादार* यांनी याबाबत भर ईदगाह मैदानात *जाब* विचारला. ईदगाह ट्रस्ट ला पैसे *जास्त* झालेत का? आम्हाला "पैसे" द्यायचे आहेत असे ठणकावून सांगितले.(स्वतः मी त्यांच्या मागील 5 व्या रांगेत उपस्थित होतो, त्यामुळे मी हें सर्व ऐकले आहे.)

हें सर्व सुरु असताना, *ईदगाह स्टेज* वर असलेल्या कोणाकडेही इम्रान यांच्या प्रश्नाचे *उत्तर* नव्हते. परंतु पैसे देण्याच्या उद्देशाने पैसे देणाऱ्या तमाम लोकांनी प्रत्येक रांगेत स्वतः *रुमाल - कापड* घेऊन धडपडत, स्वतःचं पुढाकार घेतला आणि घाईगडबडीत तात्काळ केलेल्या अथक प्रयत्नातून *3.5 लाख* रुपये जमल्याचे समजले. 




सुमारे 40 हजार मुस्लिमांना ईदगाह मध्ये पैसे देऊन "पूण्य" कमवायचे होते तथापि त्या सर्व मुस्लिमांना "दानधर्म" करण्यापासून *वंचित* ठेवण्यात आले. अन्यथा आणखी 3-4 लाख रुपये सहजचं जमले असते. हे पैसे रोखण्याचे *आदेश* देणारा तो *आका* कोण ??? या "षडयंत्रामागील" ती *अदृश्य शक्ती* कोण ?? ईदगाह ट्रस्टी की अन्य कोण ???

आतापर्यंत ईदगाह ट्रस्टच्या माध्यमातून सर्वप्रथम स्वर्गीय *हारूण शिकलगार* व त्यानंतर " *मुन्ना कुरणे* यांनी सर्व संचालकांच्या सहकार्याने ईदगाह सुशोभीकरण, कंपाउंड, विद्युत रोषणाई, विलोभनीय शानदार कमान असे "गौरवास्पद" कार्य केलेले आहे. स्थानिक *मॅकेनिक* बांधवांचा याकामी "सिंहाचा वाटा" आहे. *स्वर्गीय इस्ताकभाई* यांचे योगदान सर्वांना माहित असेलच !

जर ईदगाह मैदानावर ईदच्या दिवशी चंदा च्या माध्यमातून *6-7 लाख* सहज जमत असतील तर त्यात "चुकीचे काय" ??? ईदगाह मैदानात सुमारे 40 हजार लोकांच्या पैशातून *विधायक कार्य* होत असेल तर त्यात "वावगे" काय ?? ईदगाह च्या पैशाच्या माध्यमातून *ईदगाह मस्जिद* तसेच कब्रस्थान मस्जिद अथवा अन्य मस्जिद ना *आर्थिक* मदत दिली त्यात चुकीचे काय ?? ईदगाह च्या पैशातून *ग्रामीण* भागात जेथे मुस्लिम लोकसंख्या कमी आहे अशा ठिकाणी *अर्धवट बांधकाम* झालेल्या मस्जिद साठी हें पैसे "वापरले" जात असतील तर यात नुकसान काय ??? काही वर्षांपूर्वी *केरळ* मध्ये आलेल्या प्रलयकारी "महापुरानंतर" सांगलीतून केरळ साठी "मदत" दिली गेली. विधायक कार्यासाठी यथायोग्य ठिकाणी तुमचा पैसा "खर्च" होतं असेल तर त्याचे मनापासून *कौतुक* करायला हवे. वास्तविक सांगलीच्या ईदगाह ट्रस्ट ने "अभिमान" वाटेल असे 

*समाजकार्य* केले आहे. मग आजचं चंदा देण्याची परंपरा खंडित करण्यामागे,मुस्लिम समाजाची *अधोगती* करण्यासाठी, स्वतःचे *महत्व* "अधोरेखित" करण्यासाठी "गमिनी कावा" खेळला आहे का ??? सर्वसामान्य मुस्लिमांना पडणारा हा "यक्ष प्रश्न "आहे. आपण सर्व मुस्लिम एकच आहोत तर "चुकीच्या" कृतीसाठी कोणाचे *समर्थन* आहे??? आश्चर्य म्हणजे, सांगली नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात चंदा न घेण्याच्या कृतीबद्दल सर्व मुस्लिमांना याचे *कोडे* पडले आहे.

ईदगाह ट्रस्ट याला जबाबदार नसेल तर मग आणखी कोण आहे, ज्यांना *हस्तक्षेप* करायचा आहे ?? *न्यायाधीशाच्या* अविर्भावात कोण वावरत आहे ??? ईद च्या दिवशी ईदगाह ला पैसे न मिळण्यासाठी "राजकारण" करणारा तो *आका* कोण??? 

ईदगाह मैदानात कोणीही राजकारण न आणता, स्वार्थी दृष्टीकोन न ठेवता "सत्य" आणि *हक* ला प्राधान्य द्यायला हवे. चुकीला "चूक" म्हणण्याची मानसिकता बनवायला हवी. आता आगामी *बकरी ईद* च्या दिवशी असा चुकीचा प्रकार होऊ नये याची सर्वानी "दक्षता" घ्यावी.अल्लाह सर्वांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना ! 


*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार*)

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज, सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा