Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २ एप्रिल, २०२५

शंकरनगर येथे विनामुल्य गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार कार्यशाळेचे आयोजन

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल 8378081147


----- आपले बाळ तेजस्वी, सुदृढ व सुसंस्कारी व्हावे; आपल्या बाळाच्या माध्यमातून 'चांगला समाज' घडावा यासाठी वैज्ञानिक दृष्टि व उपाय देणारा विनामुल्य गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार कार्यशाळेचे रविवार ६ एप्रिल रोजी स्मृती भवन शंकरनगर (अकलूज) येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नावनोंदणी आरोग्य उपकेंद्र पिंपरी बुद्रुक (ता.इंदापूर) येथे करण्यात येत आहे.

    मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र व रोटरी क्लब, अकलूज आयोजित विनामुल्य गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बावडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य उपकेंद्र पिंपरी बुद्रुक येथे गरोदर मातांची नोंदणी करण्यात आली. यावेळी डॉ सुमित्रा कोकाटे, तेजस्वीनी एकतपुरे, ॲड. प्रविण कारंडे, आशासेविका रफिया तांबोळी, पुष्पा ठोकळे, सारीका वाघमारे, सुरेखा क्षिरसागर, स्वाती पाटील, रुपाली चव्हाण, विद्या देशमुख, मालन जगताप, अश्विनी देवळे, संध्याराणी कांबळे, स्वाती शिंदे, शालन गायकवाड, वृषाली सरतापे, आश्विनी शेंडगे, मनीषा देवकर, अविंधा जाधव, मनीषा जाधव आदि उपस्थित होत्या.

    तेजस्वीनी एकतपुरे यांनी सांगितले, आपले बाळ तेजस्वी, सुदृढ व सुसंस्कारी व्हावे; आपल्या बाळाच्या माध्यमातून 'चांगला समाज' घडावा यासाठी वैज्ञानिक दृष्टि व उपाय देणारा हा उपक्रम आहे. गरोदरपणात, तुम्ही ती जितकी लवकर कराल तितका अधिक फायदा त्यासाठी पती-पत्नी दोघांनीही येणे आवश्यक आहे. 

    कार्यक्रमात आपल्याला पुढील गोष्टीबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. आपलं बाळ गुणसंपन्न कसं होईल, पती-पत्नी-व बाळातील नातं कसं जोपासावं, नॉर्मल डिलिवरीचे फायदे व ती कशी होईल, गर्भसंगीत, आहारविहार, योगासने, चित्र काढणे, ग्रहण व मोबाइल किरणांचा काय परिणाम होतो, गर्भाचे स्वागत कसे करायचे व गोष्ट कशी सांगायची, मेंदूपेशींची जोडणी चांगली होण्यासाठी 'शब्दांचा खेळ' इत्यादीची परिपूर्ण माहिती रविवार, ६ एप्रिल रोजी स्मृती भवन, शंकरनगर (अकलूज) येथे देण्यात येणार आहे.

फोटो - पिंपरी बुद्रुक येथील आरोग्य उपकेंद्रात गरोदर मातांना माहिती देताना ॲड प्रविण कारंडे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा