Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २ एप्रिल, २०२५

*श्रीपूर मध्ये महापुरुषांच्या स्मारक परिसरात स्वच्छता व दुर्गंधीला जबाबदार असणाऱ्या वर कारवाई होणार का?*

 


*श्रीपूर--बी.टी.शिवशरण

श्रीपूर मध्ये दोन महापुरुष यांचे भव्य व देखणे स्मारक असलेले पुतळे आहेत या दोन आकर्षक व भव्य दिव्य स्मारकांमुळे श्रीपूर पंचक्रोशीतील नव्हे तर संपूर्ण माळशिरस तालुक्यात शोभा वाढवणारी कौतुकास्पद बाब आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या स्मारक परिसरात काही अंतरावरच इतकी अस्वच्छता दुर्गंधी पसरली आहे की या भागातून जाताना अक्षरशः मळमळणे व उलट्या होतात की काय अशी अवस्था आहे या परिसरातील चिकन सेंटरचे दुकानदार कोंबड्यांची पिसे तसेच कोंबड्यांचे टाकाऊ पदार्थ स्मारक परिसरात रस्त्यावरच दररोज टाकत असतात त्यामुळे या भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे कोंबड्यांची मुंडकी काही भाग खाण्यासाठी रस्त्यावर टोळक्याने फिरत असतात यावर कळस म्हणजे श्रीपूर मध्ये कोठेही सार्वजनिक स्वच्छतागृह व सार्वजनिक शौचालय नसल्याने बेजबाबदार नागरिक स्मारक परिसरात रस्त्यावरच लघुशंका करतात तसेच काही बेवडे मनोरूगण सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या कडेला शौच करतात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर नीरा उजवा कालवा फाटा लगत या परिसरातील काही बेशिस्त नागरिक सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर शौच व लघूशंका करून परिसर दुर्गंधीयुक्त करत आहेत मात्र या बाबींकडे कोणाचेही लक्ष जाऊ नये हे आश्चर्यकारक आहे स्थानिक सामाजिक संघटना समाजसुधारक नेते नगरसेविका एरवी मोठे नेते आमदार खासदार या भागात दौऱ्यावर आले की स्टार्च कपड्यात पुढे पुढे करून मिरवणारे त्यानंतर या बाबतीत मात्र का पुढे येत नाहीत हा न समजणारा विषय आहे नगरपंचायतीने सुध्दा हा विषय गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे या दोन स्मारक परिसरात कुणीही पाच मिनिटे नाकाला रुमाल न लावता उभे राहून दाखवावे या दोन महापुरुषांच्या जयंती निमित्त तात्पुरती रंगरंगोटी व डागडुजी किंवा वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा या परिसरात अस्वच्छता दुर्गंधी पसरणार नाही या बाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे स्थानिक चिकन सेंटरचे विक्रेत्यांना सार्वजनिक रस्त्यावर कोंबड्यांची पिसे टाकाऊ पदार्थ न टाकणे बाबत नगरपंचायने नोटीस देऊन समज देण्याची गरज आहे तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस निर्णय घेण अपेक्षित आहे नगरपंचायत चा साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत महाळुंग श्रीपूर परिसरातील स्वच्छता आरोग्य रस्ते गटारी या तक्रारी या पलीकडे सुंदर गाव सुंदर रस्ते केव्हा होणार अशी चर्चा आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा