*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. बीड पोलिसांनी ही कारवाई करत कासले याला पुण्यातील स्वारगेट भागातून ताब्यात घेतले. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी रणजीत कासले याला कोर्टात हजर केले. पोलिसांनी त्याच्या ११ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने कासलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कासलेचे मुंडेंवर कोणते गंभीर आरोप?
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निलंबित उपनिरीक्षक रणजीत कासले याने माजी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराड हा मुंडेंना नकोसा झाल्याने त्याच्या एन्काऊंटरची सुपारी देण्यात आल्याचे खळबळजनक दावा कासलेने केला. कराडच्या मागे बंदुक घेऊन थांब आणि गडबड वाटल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. याचा अर्थ कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असेही त्याने म्हटले आहे. धनंजय मुंडे चुकीच्या मार्गानं निवडणूक जिंकले. निवडणुकीच्या दिवशी माझ्या खात्यावर 10 लाख जमा झाले. ईव्हीएममध्ये छेडछाडीवेळी दूर राहण्यासाठी पैसे देण्यात आले होते. संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीतून माझ्या पगाराच्या खात्यात पैसे आले. लोकसभेला बोगस मतदान करू दिलं नव्हतं, मात्र आता विधानसभेत शांत राहण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा गंभीर आरोप कासलेने धनंजय मुंडेंवर केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा