*उपसंपादक----नूरजहां शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
*माळीनगर येथील हजरत पठाण शाह बाबा यांचा ऊस उत्साहात साजरा..*
माळीनगर( संग्रामनगर) येथील कुलदैवत सोफी संत हजरत पीर पठाणशाह बाबा रहेमतुल्लाअलैह यांचा१८ वा उरूस सालाबाद प्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला
यावर्षी निमित्त गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी माळीनगर संग्राम नगर येथून संदलची मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक दर्गाहावर आल्यानंतर पंचक्रोशीतील नागरिकां कडून जमा केलेला संदल पठाणशा बाबाच्या (मजार)समाधी वर चढवण्यात ( लेप देण्यात )आला
तसेच दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी उरुस मुबारक साजरा करण्यात आला या उरुसा निमित्त दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चे चेअरमन राजेंद्र भाऊ गिरमे यांच्या हस्ते फुलाची चादर अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी हजरत पीर पठाण बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले
याप्रसंगी बोलताना चेअरमन रंजन भाऊ गिरमे म्हणाले की माळीनगर ही भूमी समतेची आणि एकतेची असून या पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम बांधव एक दिलाने राहतात आणि पीर पठाण बाबाची दर्गा म्हणजे हे आमचे कुलदैवतच असून सामाजिक एकतेचे प्रतीक आहे पीरपठाण बाबा हे माळीनगर आणि कारखान्यावर येणाऱ्या संकट तारुण नेहतील अशी मी पठाण बाबाच्या चरणी प्रार्थना करतो
या उरुस निमित्त माळीनगर संग्राम नगर परिसरातील पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लीम भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला तसेच याप्रसंगी महाप्रसादाचे मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये हजरत पठाणशाह बाबा यांच्या दर्गाहाचे सेवक *जाफर भाई सय्यद* यांचा सिंहाचा वाटा असून त्याचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला
याप्रसंगी सासवड माळी शुगर फॅक्टरी चे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजन भाऊ गिरमे, शिरीषभाई फडे, माळीनगर ग्रामपंचायतच्या सरपंच एकर मॅडम उपसरपंच विराज निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य प्रदीप निंबाळकर , आणि सर्व सदस्य व्यापारी संघाचे -रिंकू राऊत, लक्ष्मणराव डोईफोडे , सवतगावांचे रमजान इनामदार रसूल शेख निलेश एकतपुरे ,मच्छिंद्र हजारे ,सोमनाथ हुलगे ,माजी उपसरपंच -संग्राम भोसले ,इत्यादी मान्यवरांनी उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा दरगाह कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हा उरूस यशस्वीरित्या पार पडण्यासाठी माळीनगर मुस्लिम समाज चे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव सर्व पदाधिकारी, समाज बांधव आणि ग्रामस्थ नागरिकांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा