*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या गाळामधील लालूभाई शेख यांचा गेली तीस दशकांपासून वडापावाचा व्यवसाय सुरू आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी ही शिक्षणाबरोबर लालूभाईच्या वडापावाचा आस्वाद घेत आसतात.त्यामुळे या वडापावाची प्रसिद्धी तालुक्यातील गावागावामधून झाली आहे.आज युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी या वडापावचा आस्वाद घेतला व प्रशंसा केली.लालूभाई शेख यांच्या वडिलांपासून सुरू केलेला हा व्यवसाय तिसरी पिढीतील त्यांचा मुलगा अरबाज शेख हा संभाळत आहे.त्याने उच्च शिक्षण घेऊन ही नोकरीच्या मागे न लागता आपल्या वडीलांचा व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा