*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आंबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
संभाजी ब्रिगेडच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन सादर करण्यात आले असून त्या नियोजनात सोलापूर शहरातील अनेक विविध प्रश्न राजकीय अनास्था मुळे व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे करोड रुपये खर्च करून अनेक कामे सोलापूर सिटी मध्ये केलेली होती त्याची दुरवस्था झालेली असून सर्वसामान्य जनतेचे करोडो रुपये वाया गेलेले दिसून येत आहे त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून महानगरपालिका प्रशासन व अधिकाऱ्यांना समज देण्यात यावी व सोलापुरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः जातीने लक्ष द्यावे ही विनंती.
1) सोलापूर शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण केंद्र गेल्या पाच सहा वर्षांपासून बंद आहे त्यामुळे अनेक जलतरुपटूंची गैरसोय होत आहे फक्त वीस-पंचवीस लाखांमध्ये हा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव दुरुस्त होऊ शकतो पण जिल्हा क्रीडा अधिकारी मनावर घेत नाहीत.
2) सोलापूर शहरातील करोड रुपये खर्चून एडवेंचर पार्क सिद्धेश्वर मंदिरातील लेझर शो तसेच सोलापूर शहरातील सर्व उद्याने बंद आहेत तसेच सोलापुरातील प्राणी संग्रहालय सुद्धा बंद आहे याबाबत महानगरपालिका प्रशासनास याबाबत समज देण्यात यावी. 3) जुळे सोलापूर भागातील आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाचे काम 2022 पासून नितीन गडकरी साहेबांनी निधी देऊन सुद्धा जल वहिनी काढण्यासाठी तीन वर्षापासून प्रलंबित आहे याबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना आदेश देण्यात यावे.
4) सोलापूर विमानसेवा तातडीने सुरू करण्यात यावी सोलापूर विमान तळास छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्यात यावे .
5) उजनी समांतर जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावेत तसेच सोलापूर शहरात उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो पण सोलापूर महानगरपालिकेचे वतीने जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये व्यवस्थित जल शुद्धीकरण केले जात नाही काही मशनेरी बंद आहेत त्यामुळे दूषित पाणीपुरवठ्यामुळे सोलापुरात अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत याबाबत शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यास आदेश द्यावेत.
6) छत्रपती शिवाजी महाराज सर्वपचार रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन अनेक दिवसापासून बंद आहे सिटीस्कॅन मशीन सोलापुरा उपलब्ध होऊन सुद्धा अद्याप ती यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही ते तातडीने सुरू करण्याचे आदेश अधिष्ठाता यांना देण्यात यावे.
7) सोलापूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने अतिक्रमण संबंधित अतिक्रमण काढण्यासाठी माननीय आयुक्त साहेब यांना आदेश व्हावेत.
8)सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धारमेश्वर यांच्या प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेल्या आहे ते शौचालय तिथून हटवून इतर जागी हलवावेत ही तमाम सोलापूरकर वासियांची भावना असून त्या भावनेचा आदर राखून तेथील शौचालय बंद करण्यात यावे
9) शासनाच्या विविध योजनांसाठी बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांनी तातडीने सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन शासकीय योजनेसाठी कर्ज देण्यासाठी बँकेला आदेश द्यावेत.
10) सोलापूर शहरांमध्ये मोठे उद्योगधंदे येण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न व्हावा .
11) काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला आहे पावसाळ्याची शक्यता गृहीत धरून सोलापूर शहरातील सर्व नालेसफाई चे कामे तातडीने करण्यात यावेत तसेच निधीची गरज आहे मंजूर करावा
तरी पालकमंत्र्यांनी या सर्व मुद्द्यांचा विचार करून संबंधित विभागास ही कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने आदेश द्यावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा