*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुका होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनचे आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये झालेली प्रगती कामगिरी बघता
व गेल्या तीन वर्षातील आढावा घेऊन सर्वांच्या मते डॉ.अभिजीत राजे भोसले यांची माळशिरस तालुका होमिओपॅथी संघटनेच्या अध्यक्षपदी पुनश्च निवड करण्यात आली आहे.या निवडी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पृथ्वीराज माने पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ.विठ्ठल कवितके,डॉ.नानासाहेब महामुनी डॉ.तेजस चंकेश्वरा (नातेपुते)डॉ. आनंद देशमुख डॉ.रवी पाटील, डॉ.मलिकार्जुन कुंभार,डॉ,अतुल गांधी,डॉ.निनाद दोभाडा,डॉ. सुनील गांधी,डॉ.अभिमन्यू चव्हाण,डॉ.रवींद्र पाटील सर,डॉ. अनिल बळते,डॉ.निखिल जामदार,डॉ.गणेश देशमुख (अकलूज),डॉ संजय जाधव,डॉ. प्रकाश कदम,डॉ.संजय वाळेकर, डॉ.नितीन शाह,डॉ.अविनाश भोंगले (माळीनगर,श्रीपूर, महाळुंग),डॉ पंकज नलावडे,डॉ सचिन केमकर (माळशिरस),डॉ. तुषार माने,डॉ.अभिजीत पाटील (वेळापूर) या निवडी प्रसंगी उपस्थित होते.शेवटी सर्वांच्या मते डॉ.अभिजीत युवराज राजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी डॉ.नानासाहेब महामुनी व डॉ.प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली.
या निवडी प्रसंगी नूतन अध्यक्ष डॉ.अभिजीत राजे भोसले यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,मागील ३ वर्षाचा होमिओपॅथी असोसिएशनचा चढता आलेख पाहता पुढील कार्यकाळात मोफत होमिओपॅथिक औषधोपचारचे शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे,डॉक्टरंसाठी कार्यशाळा तसेच सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा