Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

*विलेपार्ले मुंबई येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर -मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ जाहिर आक्रोश मोर्चा संपन्न*

 


*अकलूज प्रतिनिधी*

  *शकूरभाई तांबोळी*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी

विलेपार्ले मुंबई येथे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगर पालिकाने बुलडोझरने पाडल्याच्या निषेधार्थ जाहीर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता तेथील जिनमुर्ती व जिनशास्त्र याची विटंबना व अवहेलना झाली. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण सकल जैन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी 

अकलूज येथे जाहीर आक्रोश मोर्चा गुरुवार दिनांक २४/ ४/ २५ रोजी सकाळी ९ वाजता जाहीर आक्रोश मोर्चाचे आयोजन सकल जैन समाज, अकलूज यांच्या वतीने करण्यात आले होते.

याप्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील* तसेच शांतता व समन्वय समिती,अकलूज चे कार्याध्यक्ष व अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थित उपविभागीय अधिकारी अकलूज (प्रांतधिकारी )यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सकल जैन समाजातील बंधू भगिनी आणि तरुण बांधवांची प्रचंड उपस्थित होती.

तसेच सकाळी ठिक 8:30 वा.श्री‌ 1008 भगवान महावीर मंदिर पासुन हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चाची सुरुवात झाली त्या मध्ये लहान मुलांपासुन वृद्ध व्यक्तींचा समावेश होता या मध्ये परवा जम्मू काश्मीर (पेहलगाम) हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली व भ्याड हल्ल्याचा निषेध करणारे फलक होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी समाजाचे यांमध्ये श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव, श्री नवदेवता जैन मंदिर, आदिनाथ जैन मंदिर, श्री बाहुबली जैन मंदिर, श्री महावीर जैन मंदिर, श्री मुनीसुव्रत नाथ, श्री श्वतांबर जैन मंदिर, सुमती जैन महिला मंडळ सौ भाग्यश्री दोशी यांचे पदाधिकारी व सदस्य होते 




अध्यक्ष इंद्रराज दोशी, व श्रीमान शेठ जितेंद्र प्रदिप गांधी यांच्यातर्फे केली होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा