Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

*चितपट कुस्त्यांनी गाजला आदर्श गाव हिवरे बाजारचा आखाडा!...*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

हिवरे बाजार:- आदर्श गाव हिवरे बाजार येथे ग्रामदैवत मुंबादेवी यात्रेनिमित्त बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० या वेळेत कुस्त्यांच्या जंगी आखाडा विविध मान्यवरांच्या आणि नामवंत मल्लांच्या उपस्थितीत संपंन्न झाला. आखाड्याचे उद्घाटन पद्मश्री डॉ.पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते झाले.

 डोळ्याचे पारणे फेडणारा कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला असून रक्कम रु.३ हजार ते ११ हजार रुपये पर्यंत कुस्त्यांचा समावेश होता. आदर्शगांव हिवरेबाजारचा पैलवान ऋषिकेश चत्तर आणि बुऱ्हानगरचा पैलवान मोहित म्हस्के यांची प्रेक्षणीय कुस्ती झाली, विजयी पैलवानांना हिवरे बाजारमधील नामवंत मल्लांच्या स्मरणार्थ पुकारलेली रक्कम व ग्रामस्थांतर्फे सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच उपविजयी पैलवानांना सुद्धा ३० टक्के रक्कम देण्यात आली. परिसरातील जुन्या मल्लांचा फेटा बांधून श्रीफळ देऊन ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. जम्मू काश्मिर येथे अतिरेक्यांच्या झालेल्या हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच कुस्ती क्षेत्रावर अविरतपणे प्रेम करणारे हिवरे बाजारचे स्नेही माजी आमदार श्री.अरुणकाका जगताप यांना आजारपणातून लवकर बरे होण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.

हिवरे बाजार गावाला कुस्तीची फार मोठी परंपरा असून एकेकाळी प्रती कोल्हापूर म्हणून ओळखले जाणारे हिवरे बाजारच्या आखाड्यात सन १९४० पासून भारत,पाकिस्तान , अफगाणीस्तान येथील नामवंत मल्लांनी पूर्वीच्या काळात हजेरी लावली असून त्यात प्रामुख्याने महान भारत केसरी पै.मास्टर चंदगीराम, ७ हिंदकेसरी पैलवानांचा तसेच ५ महाराष्ट्र केसरी पैलवानांचा समावेश आहे.



 पै.बागुजी पवार, पै.बाबासाहेब पवार यांच्या कुस्तीच्या प्रेरणेतून पै.लक्ष्मण पवार, पै.जालिंदर चत्तर, पै.नामदेव ठाणगे या तीन पहीलवानांनी सलग १२ -१२ वर्षे आपल्या वजनगटात राज्यात कुस्ती क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवून राज्य शासनाचे सलग १२ वर्षे मानधन मिळत होते.

 यावेळी कुस्ती आखाड्यास पै. बंटी गुंजाळ ,पै. अनिल गुंजाळ,पै. पोपट शिंदे, उद्योजक पै.अशोक भगत, सरपंच विमल ठाणगे, चेअरमन छबूराव ठाणगे, व्हा.चेअरमन जालिंदर चत्तर, पै. रावसाहेब चत्तर, बाबासाहेब गुंजाळ तसेच परिसरातील नामवंत मल्ल आणि हिवरे बाजारचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा