*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
----- विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक, प्रतिमेचे पूजन व महाप्रसादाचे आयोजन करून संपन्न झाली.
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे समस्त नवबौद्ध समाजाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त नीरा भिमा कारखान्याचे संचालक संजय बोडके, पत्रकार शौकत तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पाटील, सतीश बोडके, दिलीप ठोकळे, शंकर रणदिवे, आण्णासाहेब पाटील आदि मान्यवरांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याचे हार घालून पुजन करण्यात आले. त्यानंतर लेझीम, हलगी व डिजेच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये लहान बालके, महिला, अबालवृद्धांसह नवबौद्ध समाजातील सर्वचजण सहभागी झाले होते.
दरम्यान सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच आबासाहेब बोडके, श्रीकांत बोडके, सुनील बोडके, वर्धमान बोडके, उपसरपंच संतोष सुतार, राजेंद्र मगर, सौदागर काटकर मामा, गणेश लंबाते, युवराज गायकवाड, जब्बार शेख, दादा शेख, भाऊ रणदिवे, दत्तात्रय शेंडे, कांचन शेंडे, नागनाथ गायकवाड, अक्षय पाटील, महेश पाटील, मयुर पाटील आदिंसह मान्यवर उपस्थित राहिले.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करताना मान्यवर दिसत आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा