Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

*अकलूज येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ समिती च्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन..*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ समिती, अकलूज च्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

अकलूज : येथील श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ समिती, अकलूजच्यावतीने "थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन समारंभ "या उपक्रमा अंतर्गत सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक, वीरशैव लिंगायत धर्म संस्थापक, वर्ग विरहित समाज रचनेचे आग्रही, कर्मकांड विरोधी निर्भीड व्यक्तिमत्त्व, स्त्री-पुरुष समतेचे पुरस्कर्ते, जातीअंताचे प्रणेते, कर्म हेच स्वर्ग पुरस्कर्ते महात्मा बसवेश्वर उर्फ बसवण्णा यांची जयंती. श्री लक्ष्मी बालाजी हाॅल,अकलूज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी वीरशैव लिंगायत समाज,अकलूजचे अध्यक्ष विलास क्षिरसागर, डॉ.दिलीप गुजर, नागेश नष्टे, जेष्ठ समाजसेवक .चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष महादेव पाटील या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी सुहास उरवणे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा आढावा घेत त्यांच्या विषयी कृतज्ञता अर्पण करून आदरांजली वाहिली. श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारंभ समिती,अकलूज परिसरात 'सामाजिक समतेची महत्वाकांक्षी समिती' या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम राबविते. या समितीच्या माध्यमातून गुरु रविदास महाराजांच्या विचारांचा वारसा अर्थात्‌ 'मन चंगा तो कठौती में गंगा' पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. '




मानवता धर्म सर्वश्रेष्ठ धर्म' माणून ही समिती सक्रिय आहे. संत रविदास महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्यातील वैचारिक साम्य लक्षात घेता जाणवते की आजच्या या आधुनिक समाजात उत्पन्न होत असलेल्या समस्यांवर उपाय या संत महात्म्यांच्या विचारात आहे. तरी आजच्या समाजाने थोर महापुरुषांची विचारधारा अंगीकारुन मानवता धर्म वृद्धिंगत करावा. असा सामूहिक भाव उपस्थितांच्या माध्यमातून उल्लेखण्यात आला. या समारंभ प्रसंगी माजी जि.प.सदस्या डॉ.सौ.शैलेजा गुजर, महादेव पाटील, विठ्ठल बागल, आण्णा आरवे, पिंटू वैद्य, पप्पू आंधळकर, राजू आरवे, नष्टे साहेब, कुंभार साहेब, महादेव राजगुरू, आबासाहेब शिंदे, शंकर बामणे, अशोक कांबळे, वाघोले मैडम, मोहन भगत, शंकर बागडे इत्यादी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राजाराम गुजर यांनी केले व उपस्थितांचे आभार डॉ.निवृत्ती लोखंडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा